Jalgaon News: शहरात लवकरच फेरीवाला झोन; महापालिकेतर्फे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon hawkers

Jalgaon News: शहरात लवकरच फेरीवाला झोन; महापालिकेतर्फे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात

जळगाव : शहरातील हॉकर्सला हक्काची जागा देण्यासाठी महापालिकेतर्फे फेरीवाल झोन लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. त्याचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे.

शहरात विविध भागांत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फेरीवाल्याचे अतिक्रमण झाले आहे. फुले मार्केटमध्ये, तर अतिक्रमणामुळे ग्राहकांना चालण्यासही जागा राहत नाही, तसेच या भागातील दुकानदारांनीही अतिक्रमणाला विरोध केलेला आहे.

या ठिकाणी रोज अतिक्रमणधारक व दुकानदारांमध्ये वाद होतात. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा देण्यात येणार आहे. तसेच शहरातील इतर भागांतही भररस्त्यावर अतिक्रमण झाले असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या अतिक्रमणधारकांनाही पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शासनाचा आदेश

राज्य शासनानेही राज्यातील सर्व पालिका व महापालिका अतिक्रमणमुक्त शहर करण्यासाठी ‘फेरीवाला झोन’ करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेनेही फेरीवाला झोन करण्यासाठी पावले उचलली आहेत.

शहरातील फेरीवाल्यांचे महापालिकेतर्फे सर्वेक्षण सुरू आहे. त्यांचे सर्वेक्षण होऊन यादी झाल्यानंतर झोन आखण्यात येतील व फेरीवाल्यांना पर्यायी जागा देण्याबाबत विचार करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

''शहरातील सर्व रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात येतील. वाहतुकीस अडथळा न ठरता रस्त्यांवरील विक्रेत्यांना झोन आखून देण्यात येतील. त्या ठिकाणीच हे फेरीवाले दिलेल्या वेळेत व्यवसाय करतील. यासाठी महापालिकेतर्फे सर्वेक्षण सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आहे.'' -डॅा. विद्या गायकवाड, आयुक्त, महापालिका, जळगाव

हेही वाचा: नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण