temperature
sakal
जळगाव - जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने नागरिक त्रस्त आहेत. या उष्णतेचा परिणाम आता जळगाव विमानतळावरील विमानसेवेवरही दिसू लागला आहे. विमान उड्डाणासाठी आवश्यक असलेला हवेचा दाब उष्ण वातावरणामुळे कमी असल्याने विमान कंपन्यांना विमान सुरक्षित उड्डाण करण्यासाठी प्रवासीसंख्या व सामानाचे वजन कमी करावे लागत आहे. त्यामुळे अलायन्स विमान कंपनीकडून मुंबई, अहमदाबाद ही आठवड्याला चार दिवस असलेली सेवा दोन दिवसांवर केली आहे.