Jalgaon Temperature : उष्‍णतेच्‍या झळा अधिक तीव्र! सात वर्षांनंतर एप्रिलमध्‍ये पारा ४४ अंशांवर, पुढील दोन दिवस झळा कायम

जळगाव शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा असह्य होत असून, जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४३.३ अंश सेल्सिअस इतके नोंदविला गेला.
Jalgaon Summer Heat Effect

Jalgaon Summer Heat Effect

sakal

Updated on

जळगाव - शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा असह्य होत असून, जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४३.३ अंश सेल्सिअस इतके नोंदविला गेला. रविवारी (ता.२६) तापमान ४४ अंशांपर्यंत पोहोचले असल्‍याने उन्‍हाच्‍या उष्‍ण झळादेखील तीव्र स्वरूपात जाणवत आहेत. दरम्‍यान, वाढत्‍या उष्‍णतेने जळगावकर अक्षरशः होरपळून निघत आहेत. पुढील दोन दिवस तापमानातील ही तीव्रता अशीच कायम राहणार असून, उष्णतेची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यतादेखील वर्तविली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com