esakal | Jalgaon : अतिवृष्टीने सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यातील पाणीटंचाई मिटली
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon : अतिवृष्टीने सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यातील पाणीटंचाई मिटली

Jalgaon : अतिवृष्टीने सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यातील पाणीटंचाई मिटली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठी धरणे यंदा झालेल्या अतिवृष्टीने ओसंडून वाहत आहेत. सर्वच विहिरी, कूपनलिका रिचार्ज होऊन काठोकाठ भरल्या आहेत. यामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षीही जिल्ह्यात पाणीटंचाई नसणार आहे. जिल्हावासीयांना पाण्यासाठी उन्हाळ्यात भटकंती करावी लागणार नाही. जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने खरिपाचे सुमारे चार लाख हेक्टरवर अधिक क्षेत्राचे नुकसान केले.

२० ऑगस्टपासून चांगला पाऊस झाला. ऑगस्टच्या शेवटी व सप्टेंबरमध्ये एकूण चार ते पाचवेळा अतिवृष्टी झाली. यामुळे हातातोंडाशी आलेले खरिपाचे उत्पादन नष्ट झाले. अतिवृष्टीने आजही अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली आहेत. ऑगस्टमध्ये केवळ ५७ टक्के पाऊस होता. तो आतापर्यंत १२५ टक्के झाला आहे. धरणातील साठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून पावसाने शेतकऱ्यांसह सर्वांनाच चकवा दिला.

यंदा हवामान विभागाने दमदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र तो पहिल्या महिन्यातच फोल ठरला होता. १५ जूननंतर खऱ्या अर्थाने पाऊस सुरू झाला. जुलैमध्ये पुन्हा पंधरा दिवस पावसाने ओढ दिली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते १६ ऑगस्टपर्यंत पावसाने ओढ दिली. पावसाचे वातावरण तयार होत होते. मात्र पाऊस पडत नव्हता. अखेर १७ ऑगस्टपासून पाऊस बऱ्यापैकी सुरू झाला आहे. नंतर अतिवृष्टीमुळे यंदा कपाशी, ज्वारी, बाजरी, मका, तूर, सोयाबीन ही पिके काही ठिकाणी वाया गेली आहेत.

जिल्ह्यात धरणातील साठा असा

धरण साठ(टक्केवारीत)

हतनूर ७८.८२

गिरणा १००

वाघूर १००

एकूण ९४.७४

अभोरा १००

मंगरूळ १००

सुकी १००

मोर ९७.३५

अग्नावती १००

हिवरा १००

तोंडापूर १००

मन्याड १००

भोकरबारी ३९.७६

बहुळा ९६.६८

अंजनी ९४.६७

गुळ ६१.४७

बोरी १००

एकूण ९२.९९

loading image
go to top