हाडे गोठावणारी थंडीत साहसी तरुणांनी पाच दिवसातचं हिमालयातील "संदकफू" शिखर केले पार

प्रवीण धुंदले
Saturday, 2 January 2021

हिमालयातील कोब्रा लिलींच्या विपुलतेमुळे संदकफूला "विषारी वनस्पतींचा पर्वत" म्हणून ओळखले जाते असून हा एक कठिण ट्रेक आहे.

खिर्डी (ता.रावेर): भारतातील अत्यंत कठीण मानल्या गेलेल्या हिमालयातील पश्चिम बंगाल मधील दार्जींलिंग जिल्ह्यात स्थित "संदकफू" शिखरावर जळगाव जिल्ह्यातील 10 साहसी तरुणांनी अवघ्या पाच दिवसांत चढाई केली. याबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

आवश्य वाचा- कोरोना संकटातही शहापूरच्या शेतकऱ्याने एकरी चार लाखाचे मिळवीले उत्पन्न

पश्चिम बंगाल मधील दार्जींलिंग जिल्ह्यात असलेले 'संदकफू' हे शिखर सिंगलिला रेंजमधील 12 हजार फूट उंचीवर असलेले सर्वांत उंच शिखर असुन नेपाळ सिमेच्या अगदी जवळ आहे. संदकफू शिखर गाठून जगातील पाच सर्वोच्च शिखरांपैकी माउंट एव्हरेस्ट, कांचनजंगा, लाहोत्से व मकालू असे चार शिखर येथुन दिसतात.

दहा तरुणांचा सहभाग

युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडीया (YHAI) या संस्थेने डिसेंबर- जानेवारी महिन्यात गिर्यारोहकांसाठी संदकफू शिखर सर करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात जिल्ह्यातील 10 तरुणांनी सहभाग नोंदविला होता.

पाच दिवसात सर केले शिखर

दहा तरुणांनी अवघ्या पाच दिवसांत त्यांनी 54 किलोमीटर चढाई करीत हे शिखर गाठले. ताशी 70 ते 80 किमी वेगाने वाहणारे थंड वारे, तापमान कमाल एक ते किमान उणे आठ अंश, सभोवताली हाडे गोठवणारी थंडी, प्राणवायुची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी हे शिखर सर केले.

आवश्य वाचा-  शहादा परिसरात भुकंपाचा धक्का; मध्यप्रदेशात केंद्र 

असा होता प्रवास.. 
खडतर आव्हानाची सुरवात पश्चिम बंगाल मधील दार्जींलिंग येथील बेस कॅम्पवरुन झाली. ट्रेकला सुरुवात करण्यापुर्वी दार्जींलिंग हा 6,700 फुटांवरचा बेस कॅम्प, पुढे धोत्रे (8,500 फुट), तुंबलिंग (10,000फुट), कालापोखरी (10,196फुट), संदकफू (12,000फुट), श्रीखोला (7,498फुट) असे कॅम्प होते. कालापोखरी ते श्रीखोला दरम्यान दरम्यान संदकफू हे बारा हजार फुटांवरील सिंगलीला रेंजमधील सर्वांत उंच शिखर आहे. चढाईसाठी अत्यंत अवघड व धोकादायक मानले जाते. या शिखराचा रस्ता मणिबंजन पासुन सुरु होतो. सुमारे 54 किमी लांबीचा रस्ता खुपच सुंदर आहे. येथील हिमालयातील कोब्रा लिलींच्या विपुलतेमुळे संदकफूला "विषारी वनस्पतींचा पर्वत" म्हणून ओळखले जाते. हा एक कठिण ट्रेक असल्याने गिर्यारोहकांना येथे जाण्यापुर्वी शरीराच्या तंदुरुस्तीची खुप काळजी घेतली जाते. अशा या अत्यंत कठीण शिखर सर केल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसुन येत होता.
 

वाचा- पशुधनाच्या चाऱ्याला लागली अचानक आग, शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान 
 

या गिर्यारोहकांचा सहभाग
रोमिंग राजपुत (भुसावळ), अनिल महाजन (वरणगाव फॅक्टरी), डॉ. राहूल भोईटे (वरणगाव), डॉ. रविंद्र माळी (वरणगाव), दिनेश पाटील (खिर्डी बुद्रूक), श्रीकांत माळी (वरणगाव), प्रशांत पाटील (तांदलवाडी), अजय चाळसे (वरणगाव), प्रदीप वराडे (जळगाव), समाधान महाजन (विखरण)

 

 

संदकफू ट्रेक च्या माध्यमातून स्वतःतील विलक्षण सामर्थ्याच दर्शन झाल. अद्भूत, अद्वितीय व केवळ सुंदर...! त्याच सोबत हाडे गोठवणाऱ्या हिमालयातील उणे आठ अंश थंडीच रौद्र रुप सुद्धा बघायला मिळाली.
- श्रीकांत माळी (वरणगाव)
गिर्यारोहक
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: himalayan marathi news bhusawal peak sandakafu ten young man successfully climbed