MPSC Exam Student
sakal
जळगाव - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) राज्यभरात महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्वपरीक्षा रविवारी (ता. १४) झाली. एकूण १०० गुणांसाठी १०० प्रश्नांचा हा पेपर होता. इतिहास विषयाने सर्वाधिक घाम फोडला, तर गणिताचे प्रश्न तुलनेने सोपे असले तरी प्रश्नांची लांबी अधिक असल्याने अनेक विद्यार्थ्यांना वेळेचे व्यवस्थापन करणे कठीण गेले, अशा प्रतिक्रिया परीक्षार्थींनी दिल्या.