निजामपूर : ऑनर किलिंग माणुसकीला काळिमा

सख्ख्या बहिणीचा खून करून रात्रीच उरकला अंत्यविधी
Muder
Mudersakal

निजामपूर : बावीस वर्षीय बहिणीचे कोणाशीतरी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेऊन व ती पळून जायच्या बेतात असल्याचा राग मनात धरून तिला मारहाण करून, गळफास लावून खून करत सोमवारी (ता.१३) रात्रीच तिचा अंत्यविधी उरकून टाकल्याची घटना हट्टी (ता.साक्री) येथे बुधवारी (ता.१५) उघडकीस आली. पोलिसांनी अत्यंत शिताफीने संशयित भावास गजाआड केले. संशयितास न्यायालयात हजर केले असता त्यास १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, निजामपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीकांत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, संशयित संदीप रमेश हालोर (वय २४, रा.हट्टी ता.साक्री) याने त्याची बहिण पुष्पा हिचे कोणाशीतरी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेऊन तीस मारहाण करत गळफास लावून मारले.

रात्रीच तिचा अंत्यविधी उरकल्याचे कळताच निजामपूरचे सहाय्यक निरीक्षक श्रीकांत पाटील, उपनिरीक्षक दीपक वारे, हवालदार कांतिलाल अहिरे, पोलिस नाईक संदीप ठाकरे, पोलिस शिपाई नरेंद्र माळी, अवधूत होंडे यांच्या तपास पथकाने हट्टी गाव परिसरात रवाना होऊन गोपनीय माहितीची खातरजमा करून आरोपी संदीप हालोर ह्यास ताब्यात घेतले.दरम्यान पोलिसांनी विश्वासात घेऊन त्यास विचारपूस केली असता

त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व सांगितले की, त्याची बहिण पुष्पा रमेश हालोर (वय २२) हिचे नवलाणे (ता.धुळे) येथील सागर बागूल याचे सोबत प्रेमसंबंध असल्याने ती पळून जाण्याच्या बेतात होती. त्याचा राग मनात धरून त्याने हट्टी गावाशिवारातील शिवमेंढा येथे सोमवारी (ता.१३) रात्री तीन वाजेचे सुमारास तिचे अंगावरील साडीची लेस फाडून निंबाच्या झाडाला बांधून फास तयार करून, गळफास लावून तिचा जीव जाईपर्यंत तेथेच थांबून राहिला व त्यांनतर घरी जाऊन बहिणीने स्वतः:च्या हाताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे भासवून आईसह त्याचे मित्र आणि गावातील लोकांना खोटी माहिती दिली.

पहाटे पाचच्या सुमारास तिच्यावर घाईघाईने अंत्यसंस्कार उरकून टाकले. अंत्यविधीच्या वेळी मृताच्या अंगावरील कपड्यांसह गळफास तयार केलेली साडीची लेस आदी सर्व दहनात टाकून पुरावे नष्ट केल्याचेही त्याने सांगितले.पोलिस नाईक संदीप ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निजामपूर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक दीपक वारे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com