Jalgaon News : हॉटेल-रेस्टॉरंटसह मिठाई दुकानांना स्वच्छतेसाठी मिळणार मानांकन

Hotels restaurants along with sweet shop will get rating for cleanliness jalgaon
Hotels restaurants along with sweet shop will get rating for cleanliness jalgaonesakal

Jalgaon News : नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणातर्फे हॉटेल, रेस्टॉरंट, कॅंटीन, मिठाईची दुकाने, बेकरी, चिकन-मटण दुकानासाठी स्वच्छता मानांकन (हायजीन रेटींग) योजना सुरू करण्यात आली आहे.

योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या आस्थापनांनी १३ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज करावयाचा आहे.(Hotels restaurants along with sweet shop will get rating for cleanliness jalgaon news)

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सं. कृ. कांबळे यांनी ही माहिती दिली. स्वच्छता मानांकन हे स्वमूल्यांकन व त्रयस्थ पक्षाच्या ऑडिटद्वारे प्रमाणित करण्यात येते. योजनेंतर्गत अन्न व व्यावसायिकांना आस्थापनेमध्ये अन्न सुरक्षा विषयक करण्यात येत असलेल्या उपाययोजना व त्याचे पालन याबाबत ग्राहकांचा विश्‍वास प्राप्त करण्याची संधी मिळते.

त्यामुळे ग्राहकांना उच्च मानांकित प्रमाणपत्र प्राप्त आस्थापनेमध्ये अन्न सुरक्षा विषयक नियमांचे पालन होत असल्याची हमी मिळते. प्रमाणपत्र नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणातर्फे देण्यात येते.

जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी आस्थापनांसह खासगी हॉटेल, रेस्टॉरंट, कॅंटीन, मिठाईचे दुकाने, बेकरी, चिकन-मटण दुकान आदी अन्न आस्थापनांनी योजनेमध्ये सहभाग घ्यावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी https://hygiene.fssai.gov.in संकेतस्थळावर भेट द्यावी.

जिल्ह्यात १२५ आस्थापनांचे स्वच्छता मानांकन करण्यात येणार आहे. अर्ज सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, पहिला मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, जळगाव-४२५००१ या पत्त्यावर अर्ज करावेत, असेही त्यांनी सांगितले.

Hotels restaurants along with sweet shop will get rating for cleanliness jalgaon
Jalgaon News: फळ पीकविमाप्रश्‍नी तक्रार निवारण समिती गठीत करण्याचे आदेश; केंद्रीय कृषी मंत्रालयाचे निर्देश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com