
आइस्क्रीम विक्रेत्याची ग्राहकाला लाकडी दांडा अन् फायटरने जबर मारहाण
जळगाव : आइस्क्रीम मागण्याच्या कारणावरून तरूणाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना अजिंठा चौकात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, गणेश लोहार (वय २४, रा. राकाचौक, एमआयडीसी) हा तरूण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शुक्रवारी (ता. २२) गणेश हा अजिंठा चौकात आइस्क्रीम घेण्यासाठी गेला होता. आइस्क्रीम दुकानावरील शिवा पुरभीया याला ‘लवकर आइस्क्रीम दे’ असे सांगितल्याचा राग आल्याने शिवा पुरभीया, गोविंद शिवा पुरभीया आणि रामुलाल पुरभीया (सर्व रा. अजिंठा चौफुली जळगाव) यांनी हातात लाकडी दांडा व फायटरने गणेशला बेदम मारहाण केली. याप्रकरणी गणेश लोहार यांनी रविवारी (ता. २४) रात्री संशयित आरोपी शिवा पुरभीया, गोविंद पुरभीया आणि रामलाल पुरभीया या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: हरियाणा, दिल्लीत बूस्टर डोस मोफत; महाराष्ट्रात कधी?
हेही वाचा: धक्कादायक! पोटच्या चिमुकल्याचा नाक, तोंड दाबून आईनंच केला खून
Web Title: Ice Cream Vendor Beats Customer With Wooden Stick And Fighter Jalgaon Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..