
फुलगाव येथे अवैध मद्यसाठा जप्त; मुद्देमालासह 2 संशयित ताब्यात
वरणगाव (जि. जळगाव) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने वरणगाव व फुलगाव येथे अवैध मद्यविक्री होत असलेल्या ठिकाणी छापा टाकून ६४४० व ७५० रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी दोन संशयिताना वरणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील लालमातीजवळील पहिलवान ढाब्याजवळ एक व्यक्ती दारूविक्री करत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिस कर्मचारी वसंत लिंगायत, वरणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी, पोलिस कर्मचारी नरसिंग चव्हाण व अन्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता या ढाब्यावर एक व्यक्ती लपलेल्या स्थितीत आढळला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या ताब्यात सहा हजार ४४० रुपयांच्या विविध कंपनीच्या बाटल्यांमध्ये मद्यसाठा आढळून आला. यशवंत देविदास भैसे (वय ५४, रा. आंबेडकरनगर वरणगाव) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी दीपक पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर
हेही वाचा: पिंप्राळा नाल्यावरील अतिक्रमण हटविणार : जळगाव मनपा आयुक्त
दुसऱ्या घटनेत फुलगाव येथे सुभाष अशोक शिंदे यांच्या घराजवळ स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी व वरणगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी परशुराम दळवी, बीट हवालदार आदींनी छापा टाकून सातशे पन्नास रुपयाचा मद्यसाठा जप्त केला. संशयित सुभाष शिंदे (वय ३४) यास वरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: आमदार निधीतून आता एका कामाला 50 लाखांचा खर्च!
Web Title: Illegal Liquor Stocks Seized At Phulgaon Jalgaon Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..