Budget 2023 : अर्थसंकल्पात ‘सकाळ’च्या अभियानाची छाप; महानुभावांच्या तीर्थस्थानांसाठी विशेष तरतूद

impact of Sakaal campaign in budget that Special provision for shrines of dignitaries jalgaon news
impact of Sakaal campaign in budget that Special provision for shrines of dignitaries jalgaon newsesakal

शहापूर (जि. जळगाव) : ‘सकाळ’ विदर्भ आवृत्तीतर्फे राबविण्यात येणाऱ्या श्रीचक्रधर स्वामी अष्टशताब्दी पर्वानिमित्त ‘महानुभाव स्थान महात्म्य’ अभियानाची सुरवात १८ सप्टेंबर २०२१ पासून वडधे (ता. भडगाव) येथून झाली होती. (impact of Sakaal campaign in budget that Special provision for shrines of dignitaries jalgaon news)

‘सकाळ’च्या अभियानाद्वारे समाजजागृती होऊन शासन- प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. अखेर राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात महानुभावांच्या तीर्थस्थानांसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली.
बाराव्या शतकात श्रीचक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने महाराष्ट्रात २४५ गावांमध्ये एक हजार ६५० तीर्थस्थाने निर्माण झाली. ही स्थाने महानुभावांसाठी महत्त्वाची आहेत.

आठशे वर्षांपासून अनेक आक्रमणांनंतरही या स्थानांच्या जागेत इंचभरही बदल झाला नाही. त्या जागेचे पावित्र्य महानुभावांनी तब्बल आठ शतकांपासून जपले, यथास्थिती कायम ठेवली. ऐतिहासिकदृष्ट्या ही फार मोठी उपलब्धी असून, महानुभावांनी महाराष्ट्राचा इतिहास जिवंत ठेवला.

प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा हा वारसा सुरक्षित जोपासला, ही महाराष्ट्रासाठी गौरवशाली असणारी बाब ‘सकाळ’ने उचलून धरली. त्यामुळे समाजासह शासन- प्रशासनात जनजागृती झाली. तीर्थस्थानांवर जाण्यासाठी रस्ता, वीज, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा असणे गरजेचे आहे, याची कल्पना सरकारला करून देण्यात आली.

राजभवन, मुंबई येथे १६ जून २०२२ ला विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे यांच्या नेतृत्त्वातील महानुभावांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ‘महानुभाव स्थान महात्म्य’ अभियानाची माहिती देत सविस्तर निवेदन दिले होते. महानुभाव पंथीयांच्या श्रद्धास्थानांच्या संवर्धनाकरिता योग्य पावले उचलण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देण्यात येतील, असे राज्यपालांनी या चर्चेवेळी सांगितले होते.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

impact of Sakaal campaign in budget that Special provision for shrines of dignitaries jalgaon news
Jalgaon News : पारोळा मतदारसंघात 100 कोटींच्या कामांना मंजुरी; विकासकामांना येणार वेग

निवेदनात राज्यभरातील २४५ गावांमध्ये तब्बल एक हजार ६५० स्थाने आहेत. दर वर्षी लाखोच्या संख्येने येथे भाविक भेटी देत असतात. ही स्थाने महानुभावीयांसाठी अत्यंत पवित्र तीर्थस्थाने आहेत. या स्थानांचा विकास व्हावा, या स्थानांची शासकीय दस्ताऐवजात, सात-बारावर नोंद व्हावी, तिथपर्यंत पोचण्यासाठी चकचकीत रस्ते व्हावेत, पाणी, वीज आदी सर्व आवश्यक पायाभूत सुविधा स्थापित व्हाव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची पूर्तता अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याचे दिसते.

१८ सप्टेंबर २०२१ ला पंथीय कुलाचार्य-आचार्य, संत-महंतांच्या हस्ते वडध्ये येथून ‘महानुभाव स्थान महात्म्य’ अभियान सुरू केले. या अभियानाचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कौतुक केले. या अभियानांतर्गत स्थानांची सुरक्षा, संवर्धन आणि वारसा जोपासून शासकीय दस्तऐवजांमध्ये नोंद करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

‘सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी अवतरण अष्टशताब्दी वर्षानिमित्त’ शासनाने २४५ गावांतील एक हजार ६५० तीर्थस्थानांसाठी ‘महानुभाव तीर्थक्षेत्र विकास योजना’ असा स्वतंत्र विकास आराखडा असावा, अशी मागणी पुढे आली. महानुभाव तीर्थस्थानांचा विकास आणि संवर्धनासाठी अभियान राबविणारे ‘सकाळ माध्यम समूह’ हे पहिले प्रसिद्धी माध्यम ठरले आहे.

"संपूर्ण महाराष्ट्रभर असलेल्या परब्रह्म परमेश्वर अवतार श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रेय प्रभू, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंदप्रभू व मराठी भाषेची जननी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थानाचे महात्म्य ‘सकाळ’ने ओळखले. पंचावतार चरणांकित तीर्थस्थानांचे संवर्धन आणि संरक्षणाच्या या पवित्र कार्यास सहयोग करीत असल्याबद्दल ‘सकाळ’ परिवाराचे हार्दिक अभिनंदन, धन्यवाद!" - कविश्वरकुलाचार्य महंत कारंजेकरबाबा, महानुभाव आश्रम, राजापेठ, अमरावती

impact of Sakaal campaign in budget that Special provision for shrines of dignitaries jalgaon news
Jalgaon News : कोविड काळातील गुन्हे मागे घेणार? 77 प्रस्तावांवर चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com