Jalgaon News : कन्नड घाटात विचित्र अपघातात भरधाव Truckने महिलेला चिरडले

women death in accident
women death in accident esakal

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : कन्नड घाटात कारच्या पुढे धावणाऱ्या ट्रकचे अचानक ब्रेक लागल्याने भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारचा दोन्ही ट्रकच्यामध्ये चुराडा होऊन महिला जागीच ठार झाली. तर कारमधील तिघे गंभीर जखमी झाले. मृत महिला कन्नड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या होत्या.

मालेगाव येथे प्रदीप मिश्रा यांचा शिवपुराण कथेचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. या कार्यक्रमासाठी कन्नड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या यमुनाबाई रामचंद्र पवार (वय ६८, रा. चिंचोली, ता. कन्नड) या कारने त्यांच्या कुटुंबातील कृष्णा संदीप गव्हाणे, अश्विनी कृष्णा गव्हाणे व गौरी कृष्णा गव्हाणे यांच्यासोबत सोमवारी (ता. २६) जात होत्या. (In freak accident at Kannad Ghat woman was crushed and death by a speeding truck jalgaon news)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच...

women death in accident
Jalgaon News : घामाचे पैसे द्या, अन्यथा कारखान्याना बंदच

कन्नड घाटातून त्यांची कार जात असताना सरदार पॉईंटजवळ त्यांच्या कारच्या पुढे चालणाऱ्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारला. त्यापाठोपाठ कारचालक कृष्णा गव्हाणे यांनी देखील ब्रेक मारला. त्याचवेळी त्यांच्या कारच्या मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने कृष्णा गव्हाणे यांच्या कारला जोरदार धडक दिली आणि कारला पुढे फरफटत नेल्याने कार समोरील ट्रकवर धडकली.

ज्यामुळे दोन्ही ट्रकांमध्ये कार अडकून कारचा चुराडा झाला. हा अपघात इतकी भीषण होता, की कारमधील यमुनाबाई पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरुन फरार झाला. या घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच त्यांनी अपघातस्थळी धाव घेत, वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने वाहने वेगवेगळी केल्यानंतर कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून चाळीसगावला रुग्णालयात हलविण्यात आले.

women death in accident
Jalgaon News : जिल्ह्यात Mockdrill द्वारे कोरोना सुविधांचा आढावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com