जळगाव : धुळे-सोलापूर महामार्गावर वर्षभराच्या अपघातांमध्ये पंधरा बळी

दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले असून पूर्णत्वाच्या नावाखाली दोन वर्ष आधीपासूनच टोल वसुलीस सुरुवात झाली.
dhule-solapur highway
dhule-solapur highwaysakal

पाचोड : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग(dhule-solapur highway) च्या चौपदरीकरणाचे काम मंजुरीनंतर आठ वर्षानंतर पूर्णत्वास गेले. महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर अपघाताला(ACCIDENT) चाप बसण्याऐवजी अपघाताची मालिका अद्यापही सुरूच असून सन २०२१ च्या डिसेंबर अखेरपर्यंत पंधरा जणांना अपघातात जीव गमवावा लागला; तर शेकडो जणांच्या नशिबी अपंगत्व आल्याने हा रस्ता अद्यापही वाहनधारकांसाठी यमदूतच ठरला असल्याचे चित्र आहे. (in this year 15 accident in dhule solpaur national highway )

या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले असून पूर्णत्वाच्या नावाखाली दोन वर्ष आधीपासूनच टोल वसुलीस सुरुवात झाली. रस्त्यावरील वळणे सरळ करण्याकडे केलेली वक्रदृष्टी व गाव अन् फाट्याजवळ उड्डाणपूल उभारणीस खो दिल्याने अद्याप अपघातास पूर्णतः चाप बसला नसल्याचे चित्र पाहावयास मिळते. रस्त्याच्या रूंदीकरणापूर्वी दोदडगाव ते औरंगाबाद या पासष्ट किलोमीटर अंतरात लहान मोठी १८० धोकादायक वळणे अस्तित्वात होती. रस्त्याचे चौपदरीकरण करताना ही वळणे सरळ करण्याचे नियोजन ठरले होते. मात्र, ही वळणे सरळ करण्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. अनेक धोकादायक वळणे आजही मृत्यूचे सापळे बनून "जैसे थे" आहे.

या वळणावर अपघात होऊन आज पर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला, तर कित्येक जणांच्या नशिबी अपंगत्व आले. काही वळणे मृत्यूचे सापळे (ब्लॅक स्पॉट) म्हणूनच परिचित झाली असून ती आजही कायम आहेत. बहुतांश ठिकाणी रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग न केल्याने अपघातात भर पडत आहे. महामार्गावर विविध ठिकाणी पोलिस मदत केंद्र ''तथा'' पोलिस चौक्याही उभारण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आल्याने तुर्तास महामार्ग व जालना पोलिसांसाठी हा महामार्ग अनधिकृत उत्पन्नाचे कुरणच बनले आहे.

या रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट

दोदडगाव फाटा, डोणगाव फाटा, सुंदरम जिनिंग, मुरमा फाटा, संकेत ढाबा, पाचोड बायपास, एच.पी. पेट्रोल पंप, माळीवाडी, थापटी, रोहीलागड फाटा, जामखेड फाटा, दाभरूळ, आडगाव शिवार वळणे, चिते पिंपळगाव, आडूळ गाव, आडगाव निपाणी आदी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com