Jalgaon News : चाळीसगावात गुंडांची काढली धिंड

शहरात वाढलेल्या गुंडगिरीच्या पार्श्‍वभूमीवर येथील पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुंडांना बेड्या ठोकत त्यांची पायी धिंड काढल्याने गुंडगिरी करणाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.
Suspects of the accused have been marched from the city.
Suspects of the accused have been marched from the city.esakal

Jalgaon News : शहरात वाढलेल्या गुंडगिरीच्या पार्श्‍वभूमीवर येथील पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुंडांना बेड्या ठोकत त्यांची पायी धिंड काढल्याने गुंडगिरी करणाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, असा इशाराही श्री. पाटील यांनी दिला आहे.

येथील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला दीपक उर्फ भुऱ्या गोयर याला तडीपार करण्यात आले होते. (increased hooliganism in city police inspector Sandeep Patil shackled goons jalgaon crime news)

असे असतानाही तो शहरात आल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवून त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी चांगलाच ‘प्रसाद’ दिला. त्याच्या घरात अवैधरित्या शस्त्रे असल्याचा पोलिसांचा संशय होता.

त्यामुळे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी त्याला पोलिस ठाण्यापासून त्याच्या घरापर्यंत पायी चालवत त्याची धिंड काढली. संशयित गोयरच्या घरात काहीही आक्षेपार्ह आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रस्त्यावर गुंडांना पोलिस नेत असताना स्वतः पोलिस निरीक्षक संदीप पाटील उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी गुंडाना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

‘मी ३०२ करणार’ चे स्टेट्‍स

तडीपार करण्यात आलेल्या दीपक गोयर उर्फ भुऱ्याचा भाऊ विश्‍वास गोयर याने त्याच्या मोबाईलवर ‘मी ३०२ करणार’ असे स्टेट्‍स ठेवले होते. असे स्टेट्‍स ठेवून त्याने दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याने त्याचीही धिंड काढत पोलिसांनी त्याच्याही विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुंडांवर केलेल्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

Suspects of the accused have been marched from the city.
Mumbai Crime: कारच्या बोनेटवर फटाके लावून कार पळवणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल

अवैध धंद्यांवरही हातोडा

शहरात ज्यामुळे गुंडगिरी वाढली आहे, अशा अवैध धंद्यांच्या संदर्भातही पोलिस आता ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत. शहरातील बस स्थानकामागील दारु विक्रेत्यांवर कारवाई केल्यानंतर शहरात कुठे कुठे सट्‍टा, मटक्याचे आकडे घेतले जातात, याची माहिती घेऊन आज पोलिसांनी त्या विरोधात कारवाई केली.

पालिका प्रशासनाच्या सहकार्याने शहरातील बस स्थानकामागील सट्‍टा, मटका घेणाऱ्यांच्या टपऱ्या एक बुलडोझर, पालिकेचे दहा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जमिनदोस्त केल्या. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये सध्या तरी चांगलीच धडकी भरल्याचे दिसून येत आहे.

"चाळीसगावात कोणतीही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. कुठेही सट्‍टा, मटका, जुगारासारखे अवैध धंदे सुरु असतील तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी. पोलिस त्याविरोधात कारवाई करतील."- संदीप पाटील, पोलिस निरीक्षक, चाळीसगाव पोलिस ठाणे.

Suspects of the accused have been marched from the city.
Nagpur Crime: शहरात हत्यासत्र सुरूच; संघर्षनगरातील झोपडपट्टीत खून, दारुच्या नशेत केला होता दोघांवर हल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com