
जळगाव : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे पुन्हा सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी शुक्रवारी (ता. ११) जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामाची पाहणी केली व निकृष्ट कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला, तसेच काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी केली.
जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामासाठी शासनाने निधी दिला आहे. महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामे करण्यासाठी अधिकार दिले आहेत. या विभागाने मक्तेदाराची नियुक्ती केली आहे. मात्र, रस्त्यांची कामे रखडली आहेत.
ज्या रस्त्याची कामे केली आहेत. तीही निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणतेही अधिकारी त्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे जळगावकर नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. (Inspection of city road works on Khadse action mode Answer to construction officials asked about shoddy work Demand action against the contractor Jalgaon News)
खडसे उतरले रस्त्यावर
जळगाव शहरातील रस्ते कामांच्या तक्रारीबाबत कोणीही दखल घेत नसल्यामुळे राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे थेट रस्त्यावर उतरले. त्यांनी थेट शहरातील कामे झालेल्या रस्त्याची फुटपट्टी घेऊन कोर्ट चौक ते गणेश कॉलनी व शिवाजीनगरातील पुलाच्या समांतर रस्त्याच्या कामाची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासमवेत महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी आदी उपस्थित होते.
निकृष्ट रस्तेकाम, मक्तेदारावर कारवाई करा
मक्तेदाराने केलेले काम अत्यंत निकृष्ट असल्याचे पाहणीत निदर्शनात आले. मक्तेदाराने वापरलेली खडीही निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत श्री. खडसे यांनी थेट बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ते दाखविले. यावर तुम्ही ठेकेदारावर काय कारवाई केली, अशी विचारणा केली, तसेच संबधित मक्तेदावर कारवाई करा, त्यांना काळ्या यादीत टाका, त्याच्या बिलाची अदायगी करू नका, अशी मागणीही त्यांनी केली.
सत्ता आल्यावर नेते कुठे गेले?
महापालिका निवडणुकीत जनतेची मते घेण्यासाठी आपली सत्ता आल्यास एका वर्षात जळगावचे रस्ते चकचकीत करू, अशी ग्वाही काही नेत्यांनी दिली होती. याचा उल्लेख करून ते म्हणाले, की जनतेने सत्ता दिल्यानंतर मात्र रस्त्यांची काम न करता हे नेते गायब झाले आहेत. आता ते जळगावातील जनतेला तोंड दाखवायलाही येत नाहीत, असा आरोप श्री. खडसे यांनी भाजपचे नेते व राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.