वैज्ञानिक होण्यासाठी मोठ्या शिक्षणाची गरज नाही | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैज्ञानिक होण्यासाठी मोठ्या शिक्षणाची गरज नाही

जळगाव : वैज्ञानिक होण्यासाठी मोठ्या शिक्षणाची गरज नाही

जळगाव : देशासाठी नवनवीन तंत्रज्ञान तयार करण्याचे काम विविध विज्ञान संस्थांमधून होत असते. यात इस्रो संस्थेनेदेखील मोठे काम केले आहे. या संस्थांमध्ये जाण्यासाठी उच्च शिक्षणाची गरज नाही. परंतु तुमच्यामध्ये जे कौशल्य आहे ते कौशल्य विकसित करून समाजासाठी आपण काय करू शकतो, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. समाजाभिमुख व गरजेचे संशोधन झाल्यास त्या संशोधनाचा स्वीकार हा होत असतो. यासाठी आपल्या अंगी असलेले कौशल्य विकसित करून नवनिर्मिती करण्यावर भर द्यावा, वैज्ञानिक होण्यासाठी उच्चशिक्षणाची गरज नसल्याचे प्रतिपादन इस्रोचे माजी वैज्ञानिक जयंत जोशी यांनी केले.

हेही वाचा: नेपाळने सीमावाद उकरुन काढला, भारतातल्या तीन गावांवर सांगितला हक्क

राज्यात रामानुजन अमृत भारत गणित यात्रेचे आगमन झाले. दीपनगर येथील शारदा माध्यमिक विद्यालय व किन्ही येथील सर्वोदय हायस्कूल येथे कार्यक्रम झाला. किन्ही येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश येवले होते. या वेळी मॅथ गुरू ऑफ इंडिया बी. एन. राव, वैज्ञानिक इस्रो डॉ. जोशी, होमी भाभा सायन्स सेंटरचे डॉ.सुधाकर आगरकर, रमन सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.चंद्रमौली जोशी, ब्रजेश दीक्षित, मेहुल हरसोला, किशोर राजे, महाराष्ट्र समन्वयक सुनील वानखेडे, संदीप पाटील, संजय चौधरी, भगवान पाटील, अरुण पाटील, ज्ञानदेव पाटील, अशोक येवले, मुख्याध्यापक डी. पी. साळुंखे, पर्यवेक्षक डी. सी. बाविस्कर उपस्थित होते.

दीपनगर येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. एन. गाजरे होते. एस. जी. चौधरी, व्ही. पी. राणे, मिलिंद गाजरे, पी. एस. कवठे आदी उपस्थित होते. मॅथगुरू राव यांनी विद्यार्थ्यांनी गणिताविषयीचा बाऊ करून घेतला आहे. मात्र गणित सोपे आहे. हाताच्या बोटाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना गणित समजावून सांगितले. गणितातील पाढे बोटावर करून दाखवले. वर्ग घन व मोठी अंक बेरीज कागद-पेनाच्या शिवाय करता येते, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले व गणित सोपे असल्याचे सांगितले.

loading image
go to top