cotton
cottonesakal

Jalgaon Cotton News : केवळ 15 लाख गाठींचे उत्पादन! आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी कमी

Jalgaon Cotton : जिल्ह्यात २०२३ चा कापूस हंगामात शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस कमी आणल्याने केवळ १५ लाख गाठींची निर्मिती झाली.

Jalgaon Cotton News : जिल्ह्यात २०२३ चा कापूस हंगामात शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस कमी आणल्याने केवळ १५ लाख गाठींची निर्मिती झाली. वास्तविक २२ लाख गाठी निर्मितीचे टार्गेट जिनिंग उद्योजकांनी ठेवले होते. मात्र, काही कापूस शेतकऱ्यांनी भाव वाढेल, या आशेने विकला नाही. काहींनी गुजरातच्या शेतकऱ्यांना कापूस विकला. यामुळे जिल्ह्यातील जिनिंग चालकांना पुरेसा कापूस मिळाला नाही. (15 million bales were produced during cotton season as farmers cut down on cotton sales )

असे असले तरी यंदाच्या नवीन खरीप हंगामात चांगला पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असल्याने कापसाचे उत्पादन अधिक होईल. किमान २५ लाख गाठींची निर्मिती होईल, असा अंदाज जिनिंग उद्योजकांनी व्यक्त केला आहे. २०२३ च्या पावसाळ्यात पावसाने जूनच्या शेवटी हजेरी लावली. जुलैला तो चांगला बरसला. मात्र, ऑगस्टमध्ये पुन्हा मोठा ब्रेक दिल्याने कापसाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के घट झाली.

त्यातही काही वेळा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा कापसाचा दर्जा खालावला. सुरवातीला सात ते नऊ हजारांपर्यंत भाव कापसाला मिळाला. नंतर मात्र कापसाला आंतरराष्ट्रीय स्तरावरूनच मागणी कमी झाल्याने कापसाचा दर सहा ते साडेसहा हजारांपर्यंत खाली आला. डिसेंबरमध्ये ‘सीसीआय’ने कापूस खरेदी काही केंद्रावर सुरू केली असली, तरी सात बाऱ्यावर नोंद, पासबुक, आधारकार्ड, पॅनकार्डची अट, सोबतच पेमेंट मिळण्यास उशीर आदी कारणांनी काही शेतकऱ्यांनी ‘सीसीआय’ केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते.

ज्या शेतकऱ्याला गरज होती, त्यांनी व्यापाऱ्यांना मिळेल त्या दरात कापूस विकला. व्यापाऱ्यांनी कापसाचा दर्जा पाहून पाच हजार ते सहा हजार ८०० रुपयांचा दर दिला. कापसाला किमान दहा हजारांचा भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस विकलेला नाही.(latest marathi news)

cotton
Dhule Cotton News : शहादा येथे सोमवारपासून कापूस खरेदी पूर्ववत : अभिजित पाटील

बियाणे विक्री सुरू

यंदा हवामान विभागाच्या अंदाजानुसार शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस राज्यात बरसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसह जिनिंग व्यापाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शेतकरी मोठ्या जोमाने कापूस उत्पादन घेण्यासाठी आतूर झाला आहे. आजपासूनच बागायतदार शेतकऱ्यांनी बीटी कापसाची खरेदी सुरू केली आहे. ज्यांच्याकडे विहिरीचे पाणी आहे, ते शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. चांगल्या पावसाने कापसाचे उत्पादन अधिक येईल.

परिणामी कापसाच्या गाठींची निर्मिती २५ लाख होईल, असा अंदाज आहे. २०२३ मध्ये सुरवातीला कापसाला व्यापाऱ्यांनी आठ हजारांचा दर दिला होता. नंतर मात्र कमी आवक, कापसाचा दर्जा पाहून शेतकऱ्यांकडून कापूस व्यापाऱ्यांनी पाच ते साडेसहा हजारांपर्यंत घेतला. मात्र, शेतकऱ्यांना कापसाचा दर दहा हजारांचा हवा होता. यामुळे त्यांनी कापूस कमी प्रमाणात विकला. यंदाच्या खरीप हंगामात साधारणत: सात हजारांचा दर राहील, असा अंदाज आहे.

दोन वर्षांतील गाठींचे उत्पादन असे

वर्ष--उद्दिष्ट-- गाठी निर्मिती

२०२२--२५ लाख--१९ लाख

२०२३- २२ लाख--१५ लाख

''कापसाअभावी यंदा केवळ १५ लाख गाठींचे उत्पादन झाले. शेतकऱ्यांच्या चांगल्या कापसाला सहा हजार आठशे रुपयांचा भाव होता. यंदा कापसाची आवक कमी होती. कापसाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी नव्हती. मागणी नसल्याने जिनिंगचालकांनी गाठींचे उत्पादन कमी केले. नवीन खरीप हंगामात उत्पादन चांगले येण्याची आशा आहे.''-प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग मिल ओनर्स असोसिएशन

cotton
Jalgaon Cotton News : कापसाचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांची कोंडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com