Jalgaon News : अनेर धरणात 210 मीटर पाणीसाठा; 10 दरवाजे उघडले

Jalgaon : अनेर मध्यम प्रकल्पात २०९.९० मीटर इतका पाणीसाठा झाला असून, तो २८ टक्के इतका आहे.
Water flowing through the gates of Aner Dam.
Water flowing through the gates of Aner Dam.esakal
Updated on

Jalgaon News : येथून जवळच असलेल्या अनेर मध्यम प्रकल्पात २०९.९० मीटर इतका पाणीसाठा झाला असून, तो २८ टक्के इतका आहे. सध्यास्थितीत १४.१९ दशलक्ष घनमीटर इतका हा पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे पाऊस सुरू असल्याने नदीपात्रातील प्रवाहाला वेग आलेला दिसून येत आहे. या धरणाची ९२.७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा साठविण्याची क्षमता आहे. अनेर मध्यम प्रकल्पातून अनेर पात्रात सध्यास्थितीला १५० क्यूसेक्स इतका पाणीसाठा धरणाच्या दहा दरवाज्यातून वाहून जात आहे. (210 meter water storage 10 gates opened in Aner Dam )

धरणाच्या परिसरात व नदीपात्रात आतापर्यंत १९५ मिलिमीटर इतका पाऊस झालेला आहे. धरणाची एकूण पाण्याची उंची २१६.४० मीटर इतकी आहे. धरणाच्या पात्रात सातपुडा डोंगरात पाऊस झाल्यास पाणी वाहत येऊन जमा होत आहे. उर्वरित पाणी नदीच्या पात्रातून वाहून जात आहे. सध्याच्या परिस्थितीला डोंगरदऱ्यात बऱ्यापैकी पाऊस आहे. धरण सातपुडा पहाडाच्या पहिल्या रांगेत असल्याने पहाडात भरपूर पाऊस झाल्यास मोठ्या प्रमाणात पाणी धरणाच्या पात्रात येते. (latest marathi news)

Water flowing through the gates of Aner Dam.
Jalgaon News : वीजजोडणी राहिलेल्या पाणीयोजना सुरू करा; मंत्रालयात झालेल्या जलजीवन आढावा बैठकीत मंत्री पाटील यांचे निर्देश

याशिवाय सातपुड्याच्या पहिल्या व दुसऱ्या रांगेत असलेल्या तोरी नदीमधील पाणीसुद्धा अनेरमध्येच येत असल्याने पाण्याची वाढ होते. येत्या १५ ऑगस्टपर्यंत या धरणाचे दरवाजे उघडेच असतात, तोपर्यंत धरणाच्या पात्रात आलेला अतिरिक्त पाणीसाठा नदीपात्राद्वारे वाहून जातो. गेल्या दोन-तीन दशकांचा विचार करता धरणाचे दरवाजे १५ ऑगस्टला बंद करण्यात येतात. त्यानंतर उर्वरित पाणीसाठा धरणाच्या पात्रात येणाऱ्या नदीच्या प्रवाहातून काही दिवसांत भरून धरण शंभर टक्के भरते.

Water flowing through the gates of Aner Dam.
Jalgaon News : मान्यता रद्द झालेल्या ‘प्रताप’मधील ‘त्या’ 17 शिक्षकांना उच्च न्यायालयाचा दिलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com