Jalgaon News : फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून 5 लाखांचा दंड वसूल

Jalgaon : भुसावळ रेल्वे विभागाकडून विनातिकीट आणि अवैध प्रवासाला आळा घालण्यासाठी मेल एक्स्प्रेस, पॅसेंजर, विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली.
A team during ticket checking at the railway station.
A team during ticket checking at the railway station.esakal

Jalgaon News : भुसावळ रेल्वे विभागाकडून विनातिकीट आणि अवैध प्रवासाला आळा घालण्यासाठी मेल एक्स्प्रेस, पॅसेंजर, विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. ज्यात विनातिकीट/अनधिकृत प्रवासाच्या एकूण ८९० प्रकरणांतून ५ लाख ८ हजार दंड वसूल करण्यात आला. यामध्ये तीन अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. धूम्रपान करणाऱ्यांच्या ४० प्रकरणांतून ४ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशा एकूण ९३० प्रकरणांतून ५ लाख १३ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. (Jalgaon 5 lakh fine from ticketless railway passengers)

विनातिकीट प्रवास आणि अशा इतर अनियमिततेमुळे होणाऱ्या महसुलावर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (ता. २२) वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजयकुमार.

सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट चेकिंग) रत्नाकर क्षीरसागर यांच्या नेतृत्वात भुसावळ रेल्वे विभागामध्ये सखोल तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात भुसावळ, मनमाड, नाशिक, खंडवा, बडनेरा, अकोला, जळगाव, बऱ्हाणपूर, चाळीसगाव, मलकापूर, शेगाव या स्थानकांचा समावेश होता. (latest marathi news)

A team during ticket checking at the railway station.
Jalgaon Municipality News : एप्रिलपासून जुना पाणी पुरवठा होणार बंद

या अभियानात सहाय्यक वाणिज्य प्रबंधक, मुख्य वाणिज्य निरीक्षक, वाणिज्य पर्यवेक्षक, तिकीट तपासणीस, आरपीएफ कर्मचारी यांच्या सहकार्याने हे अभियान राबविण्यात आले.

सहाय्यक वाणिज्य प्रबंधक तिकीट चेकिंग रत्नाकर क्षीरसागर भुसावळ येथे, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक कोचिंग अनिल बागले खंडवा स्टेशन येथे, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक गुड्स श्री. नन्नवरे मनमाड स्टेशन येथे विशेष तिकीट अभियानात सहभागी झाले होते.

A team during ticket checking at the railway station.
Jalgaon Eknath Khadse : एकनाथ खडसेंसह पत्नी, जावयास नियमित जामीन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com