Jalgaon Banana Damage : रावेर तालुक्यात वादळी तडाख्यात 51 कोटींची केळी भुईसपाट

Banana Damage : केळी पिकांचे एकूण ५१ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.
Banana Damage (file photo)
Banana Damage (file photo)esakal
Updated on

Jalgaon Banana Damage : तालुक्यात मे महिन्यात झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्यामुळे ४४ गाव शिवारातील १ हजार ९५० शेतकऱ्यांच्या १ हजार १४८ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकांचे एकूण ५१ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तालुक्यात मे महिन्यात दोन ते तीन वेळा वादळी पावसाचा तडाखा बसला होता. आज महसूल, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केळी नुकसानीचे पंचनामे केले. ( 51 crore worth of bananas damaged by storm in Raver taluka )

नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तयार करून वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात आला. तालुक्यात प्रतिवर्षी केळी उत्पादक शेतकऱ्यांचे वादळामुळे नुकसान होते. मात्र त्या प्रमाण नुकसान भरपाई मिळत नाही. शासनाने नुकसान भरपाई शासनाच्या हेक्टरी ४ लाख रुपये प्रमाणे द्यावी, अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. (latest marathi news)

Banana Damage (file photo)
Jalgaon Banana Crop : ‘मे हिट’च्या तडाख्याने केळी बागांना फटका; घट सटकण्याचे प्रमाण वाढले

रावेर तालुक्यात केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, कृषी विभाग व महसूल विभागाचे नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे सादर केला आहे. वादळी वाऱ्यामुळे १ ते ३१ मे दरम्यान रावेर तालुक्यातील ४४ गावांमधील ऐन कापणीला आलेली केळी जमीनदोस्त झाली. लागवडी क्षेत्र २३०२ हेक्टर पैकी तब्बल ११४८.३४ हेक्टर केळी जमीनदोस्त झाली.

त्यात सर्वाधिक नुकसान झालेली गावे, शेतकरी संख्या व हेक्टर क्षेत्र असे : पुरी ११३ शेतकरी, ११३.७६ हेक्टर क्षेत्र, रोझोदा ११४ शेतकरी, ८७.७४ हेक्टर क्षेत्र, खिरोदा प्र यावल २२४ शेतकरी २७६ हेक्टर क्षेत्र, कळमोदा १४० शेतकरी १३२ हेक्टर क्षेत्र, सावखेडा १७१ शेतकरी १८७.४७ हेक्टर क्षेत्र, अटवाडा १२७ शेतकरी, १९५.५६ हेक्टर क्षेत्र, यासह रावेर तालुक्यातील एकूण ४४ गाव शिवारातील १९५० शेतकऱ्यांचे ११४८.३४ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकांचे सुमारे ५१ कोटी ३ लाख २२ हजार २९६ रुपयांचे नुकसानीचा अंतिम अहवाल तहसीलदार बी. ए. कापसे कृषी आधिकारी भाऊसाहेब वाळके यांनी शासनाकडे सादर केला आहे.

Banana Damage (file photo)
Jalgaon Banana News : निंभोरा रेल्वेस्थानकातून केळी वॅगनसाठी ‘ग्रीन सिग्नल’; 5 जूनपासून वाहतूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com