Jalgaon News : रेकॉर्डवरील 6 गुन्हेगारांना अटक; एमआयडीसीचे कोम्बिंग ऑपरेशन यशस्वी

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिसांनी रविवारी (ता. २८) रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविले.
Ajay Garunge, Golu Pardeshi, Uday Mochi, Bhola Bagde, Aba Patil, Vishal Surwade
Ajay Garunge, Golu Pardeshi, Uday Mochi, Bhola Bagde, Aba Patil, Vishal Surwadeesakal

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिसांनी रविवारी (ता. २८) रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविले. हद्दपार, चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्यांसह वॉरंट असलेले रेकॉर्डवरील ६ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. नाकाबंदीत १३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. (Jalgaon 6 criminals on record arrested news)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कोम्बिंग ऑपरेश राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपअधीक्षक संदीप गावित, पोलिस निरिक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक आसाराम मनोरे, उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, दत्तात्रय पोटे, संजयसिंग पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, अनिल तायडे, मंगेश बागूल, दिनेश चौधरी, संदीप सपकाळे, सचिन पाटील, योगेश बारी, चेतन सोनवणे, सतीश गजे, सिद्धेश्वर डापकर, चंद्रकांत पाटील, गणेश वंजारी आदींनी रविवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविले. (Latest Marathi News)

Ajay Garunge, Golu Pardeshi, Uday Mochi, Bhola Bagde, Aba Patil, Vishal Surwade
Nashik Crime News : 2 वर्षांपासून फरार संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक; झटपट दुप्पट-तिप्पट रकमेचे आमिष

दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला उदय रमेश मोची (रा. रामेश्वर कॉलनी), राहुल पांडे (रा. सुप्रिम कॉलनी), अजय बिरंजू गांरुगे (तांबापुरा), भोला राकेश बांगडे (रा. सुप्रिम कॉलनी), विशाल भागवत सुरवाडे, गोलू ऊर्फ राजकिसन मानसिंग परदेशी, आबा मधुकर पाटील (तिघे रा. रायपूर, कुसुंबा) यांना ताब्यात घेण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील १३ अट्टल गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदीत १३ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Ajay Garunge, Golu Pardeshi, Uday Mochi, Bhola Bagde, Aba Patil, Vishal Surwade
Pune Crime News : बालकाला पळवून तीन लाखांत विकलेल्या टोळीचा छडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com