Jalgaon Municipality News : सामान्य बेघरांसाठी समता नगरात 816 घरांचा प्रकल्प; महापालिकेतर्फे उभारणी

Jalgaon Municipality : पंतप्रधान निवास योजनेंतर्गत सामान्यांसाठी समता नगरात महापालिकेच्या जागेत ८१६ घरांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal

Jalgaon Municipality News : पंतप्रधान निवास योजनेंतर्गत सामान्यांसाठी समता नगरात महापालिकेच्या जागेत ८१६ घरांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी जागेच्या क्रमांकांचा घोळ असल्याने यासंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार सुरेश भोळे व मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांची बैठक संयुक्त बैठक झाली.

त्यात प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी व मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठीचे शासकीय शुल्क महापालिकेने अदा केले आहे. (Jalgaon 816 houses project in Samata Nagar for general homeless Construction by Municipal Corporation)

सर्वसामान्य लोकांना हक्काचे व परवडणारे घर मिळावे यासाठी २०१९-२० मध्ये ८१६ घरकुले मंजूर झाली आहेत. घरकुले मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करावयाची होती. परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे ही घरकुल योजना पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेत बैठक घेतली.

आमदार सुरेश भोळे, आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते. संपूर्ण परिसराचा नकाशा व उतारे घेऊन जागेचे मोजमाप करून कामाला सुरवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. (latest marathi news)

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Lemon Rates Hike : लिंबाच्या दरात वाढ; भाजीपाला स्थिर; गारपीट, ‘अवकाळी’मुळे आवक मंदावली

घरकुल धारकांस शासनाकडून अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे. तसेच शहरातील बेघर असलेल्या नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध होणार आहे.ही योजना वेळेत पूर्ण न झाल्याने घरकुल बांधकामांची मुदतही संपुष्टात आली होती मात्र, त्यानंतर आता शासनाने ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्या अनुषंगाने मनपा प्रशासनाकडून समता नगर जवळील घरकुलांसाठी आरक्षित जागेवर घरकुल योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

"प्रकल्पासाठी मक्तेदाराची निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. जो कमी दरात नागरिकांना घर उपलब्ध करुन देईल, त्या एजन्सीला काम देण्यात येईल."- डॉ.विद्या गायकवाड, प्रशासक तथा आयुक्त महापालिका, जळगाव

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Lok Sabha Election News 2024 : रक्षा खडसेंच्या उमेदवारीने ‘राष्ट्रवादी’समोर पेच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com