
मुलाला साहेब झालेला पाहण्याचे स्वप्न मात्र तिचे कायमचेच विरले...
मेहूनबारे (ता.चाळीसगाव) : आपल्याला पुरेसे शिक्षण घेता आले नाही मात्र आपल्या मुलाला योग्य ते शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करायचे आणि साहेब झालेले पाहण्याचे स्वप्न माऊलीचे अपघाती मृत्यूने भंगले. जामदा (ता. चाळीसगाव) येथील पती-पत्नी आपल्या मुलाला पिंपळनेर (ता. साक्री) येथे शाळेत शिकण्यासाठी सोडायला जात होते. त्यावेळी मोटरसायकलचा अपघात झाला आणि पाच दिवस मृत्यूची झुंज दिल्यावर अखेर त्या मुलांच्या आईचा आज मृत्यू झाला. मुलाला साहेब झालेला पाहण्याचे स्वप्न मात्र तिचे कायमचेच विरले.
जामदा (ता.चाळीसगाव) येथील कोमलसिंग तिरसिंग राजपुत व त्यांची पत्नी सुनिता हे जळगाव येथे पिंप्राळा भागात वासत्व्यास होते.त्यांचा मोठा मुलगा दिव्यराज हा १३ आठवीत तर लहान मुलगा नैतिक हा ५ वर्षाचा आहे.(ता.१२) जुन रोजी कोमल राजपुत व त्यांची पत्नी सुनिता हे दोघे मुलगा दिव्यराज याला घेऊन दुचाकीवरून पिंपळनेर (ता. साक्री) येथे सोडण्यासाठी जात होते.मुलगा चांगल्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाणार यामुळे आई वडील आनंदात होते.
ब्रेकरने केला घात...
जळगाव येथून दुचाकीवरून निघाल्यावर नेर कुसंबाजवळ असलेल्या रसत्यावरील ब्रेकरचा अंदाज न आल्याने सुनिताबाई ह्या त्या ठिकाणी गाडीवरून पडल्या खाली पडल्या व त्यांना तातडीने धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.या रुग्णालयात तब्बल ५५ तास सुनिताबाई यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचाराला पाहीजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना (ता.१४)रोजी पुढील उपचारासाठी नाशिक येथे रवाना करण्यात आले.
मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
सुनिताबाई यांना धुळे येथुन नेल्यावर नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सुनिताबाई यांनी पाच दिवस मृत्युशी झुंज सुरु असतानाच आज सकाळी साडेआठच्या सुमारास (ता.१७) रोजी प्राणज्योत मालवली या घटनेनंतर जामदासह परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्यावर उद्या (ता.१८) रोजी १० वाजता जामदा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दोन्ही मुले झाली पोरके
सुनिताबाई यांची दोन्ही मुले दिव्यराज आणि नैतिक हे दोन्ही मुले आईच्या प्रेमाला पोरकी झाली दोन्ही मुले हुंदके देत म्हणत होती आम्हाला आमच्या आईकडे घेऊन चला अस म्हणत असतांना अनेकांचे डोळे पाणावले होते. घार हिंडते आकाशी चित्त तिचे बाळापाशी,,खरंच जी माऊली नऊ महिने नऊ दिवस आपल्या पोटात बाळाला ठेवते, आणि त्याच मुलांसाठी रात्रंदिवस उभी असते ती आई अहो ,,ती आई स्वता पोटाला कमी खाते पण बाळाचे लाड पुरवते,या बाळांचे लाड पुरवणारी आईनेच जगाचा निरोप घेतला त्यामुळे दोन्ही मुले आईच्या प्रेमाला पोरकी झाली.
Web Title: Jalgaon Accident News School Mother Death In Accident Mother Dream Spoiled Chalisgaon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..