The crowd at the accident site on the highway, the accident scooty.esakal
जळगाव
Jalgaon Accident News : ह्रदयद्रावक! परमेश्वराने ‘खुशी’च हिरावून घेतली; अपघात म्हणून थांबले, अन पाहिले तर...
Accident News : रिक्षातील दोघींना पायलची दुचाकी दिसल्याने त्यांनी रिक्षातून उतरून धाव घेतली. बघता तर काय? पायल आणि दीक्षिता यांना महामार्गावर निपचीत पडलेले पाहून दोघांनी हंबरडा फोडला.
Jalgaon Accident News : उड्डाणपुलाजवळ अपघात होऊन गर्दी झाली होती. कसली गर्दी झालीय, म्हणून चालकाने रिक्षा थांबविली. रिक्षातूनच मुलीची दुचाकी दिसल्याने दोघा महिलांनी धाव घेतली. बघता तर काय, दोघींच्या मुलींचा मृतदेह पाहताच रिक्षातील दोघी महिलांनी आक्रोश करत डोक्याला हात लावला. अपघाताचे विदारक दृष्य बघेनासे होवून दोघा महिला सुन्न झाल्या होत्या. (accident of two girls by collision with tanker)