Jalgaon News : एरंडोलला नवीन प्रशासकीय इमारती मंजूर; ब्रिटीशकालीन कार्यालय पाडण्यास सुरुवात

Jalgaon : प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालय एकाच ठिकाणी होण्यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
British era building of Tehsildar office to be demolished.
British era building of Tehsildar office to be demolished.esakal
Updated on

एरंडोल : येथील प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालय एकाच ठिकाणी होण्यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. नगरविकास खात्यांतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून नवीन कार्यालयाच्या बांधकामासाठी सुमारे अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार, तहसीलदार कार्यालयाची ब्रिटीशकालीन इमारत पाडण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही कार्यालयांची नवीन सुसज्ज इमारत झाल्यानंतर नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. (Administrative Building Granted to Erandol Demolition of British Era Office Begins )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com