
जळगाव : शेतीपंपासह केबल चोरणारी टोळी अटकेत
जळगाव : तालुक्यातील आसोदा आणि करंज शेतशिवारातील विहिरीतील वीजपंपाची चोरी करणाऱ्या तीन संशयितांना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. आसोदा ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून चोरट्यांनी केबल व पंपाची चोरी केली होती. त्याचप्रमाणे करंज गावातील शेतकरी संजय सपकाळे, शंकरलाल सोनवणे, भगीरथ सोनवणे आणि रवींद्र पाटील या चार शेतकऱ्यांच्या शेतातून ४ मार्चला वरजपंप आणि केबल चोरून नेले होते. या दोन्ही घटनेबाबत जळगाव तालुका पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली होती.
याप्रकरणी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक माणिक सपकाळे, वासुदेव मराठे, ईश्वर लोखंडे, बापू पाटील, साहेबराव पाटील, संदीप पाटील, प्रशांत पाटील, बापू कोळी, जयेंद्र पाटील यांनी माहितीच्या आधारे जितेंद्र परल्या बारेला, जितेंद्र भगवान कोळी आणि अविनाश वसंत भिल या तिघांना अटक केली आहे. संशयितांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
कॉपर वायर जप्त
संशयित जितेंद्र बारेला, जितेंद्र कोळी आणि अविनाश भिल (सर्व रा. अट्रावल, ता. यावल) यांच्याकडून १० हजार ८५० रुपयांची २५ किलो कॉपर वायर जप्त केली आहे. संशयितांनी आठ गुन्ह्यांची कबुली दिली असून, अधिक तपास सुरू आहे.
Web Title: Jalgaon Agricultural Pump And Cable Thief Gang Arrested
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..