Jalgaon Agriculture News : ज्वारी, कडधान्य, हळदीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

Jalgaon Agriculture : तालुक्यात खरीप पिकांच्या पेरणीसाठी २४ हजार ६८५ हेक्टर क्षेत्र लक्ष्यांक देण्यात आला आहे.
A flowering crop of horticultural cotton.
A flowering crop of horticultural cotton.esakal

Jalgaon Agriculture News : तालुक्यात खरीप पिकांच्या पेरणीसाठी २४ हजार ६८५ हेक्टर क्षेत्र लक्ष्यांक देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेतीची कामे पूर्ण केली आहे. तालुक्यात बागायती कापूस पेरणी सुरू आहे. पंधरा दिवस आधी पेरणी केलेल्या कपाशीची उगवण चांगली झाली असून, ज्वारी, कडधान्य व हळद पिकांच्या पेरणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रावेर तालुक्यात खरीप पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी शेतात नांगरणी, वखरणी, शेतातील काडी कचरा गोळा करून शेत खरीप पिकांच्या पेरणीसाठी तयार केले आहे. ( Sorghum Pulses Turmeric are likely to increase )

तालुक्याला २४ हजार ६८५ हेक्टर क्षेत्र खरीप पिकांसाठी लक्ष्यांक दिले आहे. पीकनिहाय लक्षांक असे. यात तृणधान्य - ज्वारी २ हजार ४५०, बाजरी १०० हेक्टर, मका २१५०, कडधान्य - तूर ७५०, मूग ४५०, उडीद ९८०, तेलबिया - भुईमूग ६०, सोयाबिन ७००, कापूस १७ हजार ४५ हेक्टर असे लक्ष्यांक दिले आहे.

यात ज्वारी, तूर, उडीद, मूग व भुईमूग पिकाच्या पेरणीत वाढ होण्याची शक्यता आहे तर मका २२३, सोयाबिन १५० व कापूस ११७ हेक्टर क्षेत्रात पेरणीत घट येण्याची शक्यता आहे. यामुळे कडधान्य, ज्वारी, हळद यांना चांगला भाव मिळाला होता. यामुळे या पिकांच्या पेरणीत वाढ होण्याची शक्यता आहे तर कपाशीला भाव न मिळाल्यामुळे या पिकाच्या पेरणीत घट येण्याची शक्यता आहे. (latest marathi news)

A flowering crop of horticultural cotton.
Jalgaon Agriculture News : ज्वारी उत्पादकांना साडे तिनशे कोटीहून अधिक दणका!

बागायती कापूस पेरणी अंतिम टप्यात

यावर्षी उन्हाळा तीव्र होता. तरीही काही शेतकऱ्यांनी कापसाचे बीटी बियाणे उपलब्धतेनुसार २० मेपासूनच बागायती कपाशीची पेरणी सुरू केली आहे. बागयती कपाशीची उगवण चांगली झाली आहे. तर वातावरणातील उष्मा कमी झाल्यामुळे बागायती कपाशीची पेरणी सुरू आहे. सुमारे आठ ते नऊ हजार हेक्टर क्षेत्रात बागायती कपाशीची पेरणी होईल, अशी अपेक्षा आहे.

रावेर तालुक्यात ४ जूनपासून किमान दोन वेळेस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. सात जूनपासून मृग नक्षत्रास सुरवात होत आहे. वीसपर्यंत मान्सूनचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज असून, पेरणीलायक पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

A flowering crop of horticultural cotton.
Jalgaon Agriculture News : कोचूर येथील पाटील कुटुबाने जिद्दीने फुलविली बाग; अक्षय तृतीयेला आला अविट गोडीचा पहिला बहार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com