
अमळनेर : राज्यातील शेतकरी सुजलाम व सुफलाम व्हावा, यासाठी सरकार काम करीत आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजना सरकार राबविते. राज्यातील जवळपास ४४ लाख शेतकऱ्यांना वीजमाफी मिळणार आहे. पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज पुरविण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेनिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात दिले. शहरातील कलागुरू मंगल कार्यालयात सोमवारी (ता. १२) आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. (Ajit Pawar Jan Sanman Yatra in Amalner)