
जळगाव : जिल्ह्यातील ११ विधानसभा क्षेत्रासाठी विविध पक्षांकडून निवडणूक लढविणाऱ्या तब्बल ५४ उमेदवारांना सशस्त्र पोलिस सुरक्षा पुरविण्यात आली आहे. कुठल्याही उमेदवाराने अशी सुरक्षा मागितली नसताना केवळ जिल्हास्तरीय समितीने शिफारस केली म्हणून ही सुरक्षा पुरविल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. अर्थात समितीने नोंदविलेल्या निरीक्षणांमध्ये या उमेदवारांच्या जीविताला धोका संभवतो, असा होतो. मग, जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था किती व कशी ढासळलीय याचाही अंदाज गृहविभागाने घ्यायला हवा, असे बोलले जात आहे. ( 54 candidates in constituency are only ones contesting elections in celebration of democracy )