

Jalgaon Crime News Five Held After Brutal Assault Linked to Love Marriage Dispute
Esakal
भुसावळ, ता. २१ : तालुक्यातील खडका येथील तरुणाने प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून खांबाला बांधून निर्वस्त्र करून बेदम मारहाण केली. शुक्रवारी (ता. २०) दुपारी ही घटना घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुण व तरुणी यांनी १८ मार्चला घरातून पळून जाऊन पंचवटी (नाशिक) येथे विवाह केला. त्यानंतर १९ मार्च रोजी दोघांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात हजर राहून विवाहाची माहिती दिली होती. त्यानंतर दोघांचा जबाब नोंदवून पोलिसांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले.