
धानोरा (ता. चोपडा) : नुकताच विधानसभा निवडणुकीचा पडघम वाजला आहे. निवडणुकीमुळे ग्रामीण भागात वातावरण चांगलेच तापू लागले असून, गावोगावी कोणत्या उमेदवाराची सरशी होणार? कोणता पक्ष सत्तेवर येणार? याबाबत पारावर पैजा लावल्या जात आहेत. विधानसभा निवडणूक कधी नव्हे, एवढी लक्षवेधक ठरू लागली आहे. राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली आहे. पक्षांची फाटाफूट, नेतेमंडळींच्या बेडूक उड्या या साऱ्याचा परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. (assembly election heats up atmosphere in rural areas bets are placed in mercury arena )