A cemetery with lack of facilities on Marwad road in the city and another picture shows the collapse of a cemetery slab in Pailad area.esakal
जळगाव
Jalgaon News : अमळनेरातील स्मशानभूमींची बिकट अवस्था; दुरुस्तीकडे दुर्लक्षच
Jalgaon : शहरातील सर्वच स्मशानभूमींची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी अनेक अडचणींना सामोरे जात अंत्यविधी पार पाडला जात आहे.
आर. जे. पाटील : सकाळ वृत्तसेवा
Jalgaon News : शहरातील सर्वच स्मशानभूमींची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी अनेक अडचणींना सामोरे जात अंत्यविधी पार पाडला जात आहे. म्हणून शहरात अत्याधुनिक विद्युत दाहिनी (स्मशानभूमी)ची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. अमळनेर शहराची लोकसंख्या दीड लाखाच्या घरात गेली आहे. मात्र, या लोकसंख्येच्या मानाने नगरपालिकेकडून पायाभूत सुविधा पुरविताना दुर्लक्ष होत आहे. (Bad condition of graveyards in Amalner )

