Jalgaon Temperature : जळगाव जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’; पारा ४५.५ अंशांवर, यंदाच्या मोसमातील उच्चांकी तापमान

जळगाव जिल्ह्याने यंदाच्या मोसमातील उष्णतेचा उच्चांक गाठला असून, आज तापमानाचा पारा चक्क ४५.५ अंशांवर पोहोचला आहे.
Jalgaon Temperature

Jalgaon Temperature

sakal

Updated on

जळगाव - जिल्ह्याने यंदाच्या मोसमातील उष्णतेचा उच्चांक गाठला असून, आज तापमानाचा पारा चक्क ४५.५ अंशांवर पोहोचला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ही उष्णतेची लाट पुढील दोन दिवस कायम राहणार असून, दिवसाच्या आगीच्या झळांबरोबरच रात्रीचा किमान पाराही ३० अंशांच्या वर गेल्याने जळगावकरांची झोप उडाली. उन्हाच्या या तीव्र काहिलीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com