Jalgaon Lok Sabha Constituency : भाजप या वेळी विजयात ‘पास’ होणार की ‘फेल’

Jalgaon News : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांत गेल्या पाच पंचवार्षिक निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने यश मिळविले आहे. भाजपच्या उमेदवारांचे मताधिक्य प्रत्येक निवडणुकीत वाढतच गेले.
Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Constituency esakal

Jalgaon News : गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना चार लाखांचे मताधिक्य मिळाले होते. त्या मताधिक्याच्या बळावरही या वेळी भाजपच विजयाचे गणित बांधत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या वेळीच्या बदलत्या परिस्थितीत भाजप विजयात ‘पास’ होणार की ‘फेल’ याकडेच आता लक्ष असेल. (Jalgaon Lok Sabha Constituency)

जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांत गेल्या पाच पंचवार्षिक निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने यश मिळविले आहे. भाजपच्या उमेदवारांचे मताधिक्य प्रत्येक निवडणुकीत वाढतच गेले. सन २०१४ पासून तर भाजपच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवाराला चार लाखांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले आहे.

सन २०१४, २०१९ च्या निवडणुकांत पक्षाच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या आसपासही विरोधी पक्षाचे उमेदवार दिसत नसल्याचे चित्र आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील सन २०१४ च्या मतदानाचे चित्र पाहिल्यास भाजपचे उमेदवार ए. टी. पाटील यांना तब्बल सहा लाख ४७ हजार ७७३ मते मिळाली आहेत. विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णासाहेब सतीश पाटील यांना केवळ दोन लाख ६४ हजार २४८ मते मिळाली.

तब्बल चार लाखांचे मताधिक्य उघडपणे दिसत आहे. सन २०१९ च्या निवडणुकीतही हाच ट्रेंड कायम राहिलेला दिसतो. विशेष म्हणजे, भाजपने या वेळी तब्बल दोन वेळा उमेदवार बदलूनही मोठे मताधिक्य मिळाल्याचे दिसत आहे. यात भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांना सात लाख १३ हजार ८७४ मते मिळाली; तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांना तीन लाख दोन हजार २५७ मते मिळाली. या ठिकाणीही चार लाख मताधिक्य कायम असल्याचे दिसत आहे. (Latest Marathi News)

Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Election : प्रा. मनोज पाटील यांच्या प्रवेशामुळे एकनाथ शिंदे गटाची ताकद वाढणार

गेल्या दोन निवडणुकांत भाजपला मिळालेल्या मताधिक्याच्या बळावर या वेळीही पक्षातर्फे यशाचे गणित मांडले जात आहे. पक्षाच्या उमेदवार स्मिता वाघ यांना या वेळी चार लाखांपेक्षा अधिक मताधिक्य मिळण्याचा दावा पक्षाच्या नेत्यांतर्फे केला जातो. याच गणिताच्या बळावर पक्षाच्या प्रचाराची आखणीही केली जात असल्याचे सांगितले जात आहे.

पक्षातर्फे गेल्या दोन पंचवाषिकच्या मताधिक्यावर असलेल्या विजयाच्या गणितात भाजपने या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात दहा वर्षांत केलेल्या कार्याचे बळ वापरले. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचा चेहरा या वेळी पक्षातर्फे मतदारांच्या केंद्रस्थानी ठेवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्याच बळावर या वेळी चार लाखांचे मताधिक्य मिळणार असल्याचा दावा करण्यात येतो.

भाजप नेतेही भाषणात आम्ही चार लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येण्याचा दावा करीत आहेत. भाजप गेल्या दोन पंचवार्षिकप्रमाणेच दावा करीत असले, तरी या वेळी भाजपविरोधी असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांची स्थिती वेगळी आहे. गेल्या दोन पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या मूळ पदाधिकाऱ्यांनाच उमेदवारी दिली.

Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Constituency : ‘ग्लोबल’ विरुद्ध ‘लोकल’ प्रारंभिक प्रचाराच्या मुद्यांचा संघर्ष

परंतु या वेळी मात्र विरोधी पक्षाने भाजपमध्येच तोडफोड केली आहे. भाजपने उमेदवार नाकारलेले विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनाच विरोधी पक्षाने थेट प्रवेश दिला; तर पक्षाचे युवा पदाधिकारी करण पवार यांना पक्षात घेऊन थेट उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांनी भाजपच्या मतातच आपला हिस्सा टाकला.

त्या वेळी भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँगेस आघाडी असा मुकाबला होता; परंतु आता भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी ‘महायुती’; तर शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व काँग्रेस अशी ‘महाविकास आघाडी’ अशी लढत आहे.

अशा स्थितीत या वेळी मतांचे ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांप्रमाणे या वेळी चित्र नसल्याने लाखोंच्या मताधिक्याचे गणित भाजप कसे जुळविणार, याकडेच लक्ष असेल. यातच भाजपत पडलेली फूट, तसेच इतर बाबीही आहेतच. त्यामुळे भाजप आपल्या गणितात ‘पास’ होणार की ‘फेल’, हे निवडणूक निकालानंतर दिसून येणार आहे.

Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon News : पाण्याच्या शोधात बिबट्याचा छावा विहिरीत; वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com