Bhusawal- Pandharpur Train : ‘भुसावळ- पंढरपूर’ विशेष गाड्या; मध्य रेल्वेतर्फे भाविकांची सोय

Bhusawal- Pandharpur Train : ०११५९ भुसावळ-पंढरपूर विशेष गाडी भुसावळ येथून १६ जुलैला दुपारी दीडला सुटेल.
Ashadi ekadashi Special train to Pandharpur
Ashadi ekadashi Special train to Pandharpuresakal

Bhusawal- Pandharpur Train : मध्य रेल्वे पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी नागपूर-मिरज, नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर, ‘पंढरपूर आषाढी एकादशी’ विशेष गाड्या चालविणार आहे. ०११५९ भुसावळ-पंढरपूर विशेष गाडी भुसावळ येथून १६ जुलैला दुपारी दीडला सुटेल. दुसऱ्या दिवशी १७ जुलैला पहाटे साडेतीनला पंढरपूरला पोहोचेल. ०११६० विशेष गाडी पंढरपूर येथून १७ जुलैला रात्री साडेदहाला सुटेल. (Bhusawal Pandharpur special trains provided by Central Railway )

दुसऱ्या दिवशी १८ जुलैला दुपारी एकला भुसावळला पोहोचेल. ही गाडी जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी येथे थांबा घेईल. ०१२०५ नागपूर-मिरज स्पेशल (२ सेवा) विशेष गाडी नागपूर येथून १४ जुलैला सकाळी ८ वाजून ५० मिनिटांना सुटेल. दुसऱ्या दिवशी १५ जुलैला ११ वाजून ५५ मिनिटांनी मिरजला पोहोचेल. ०१२०६ विशेष गाडी मिरज येथून १८ जुलैला दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल.

दुसऱ्या दिवशी १९ जुलैला १२ वाजून २५ मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसाबा डोंगरगाव, जठरगाव धालगाव, कवठेमहांकाळ व सुलगरे या रेल्वेस्थानकावर ती थांबेल.(latest marathi news)

Ashadi ekadashi Special train to Pandharpur
Bhusawal Railway: भुसावळ रेल्वेत 4 महिन्यांत पायाभूत सुविधांचा विस्तार; स्वयंचलित सिग्नल व्यवस्था, लूप लाइनवर भर

०१११९ नवी अमरावती-पंढरपूर विशेष (४ सेवा) गाडी नवी अमरावती येथून १३ व १६ जुलैला दुपारी अडीचला सुटेल. दुसऱ्या दिवशी ९ वाजून १० मिनिटांनी पंढरपूरला पोहोचेल. बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी याठिकाणी गाडीला थांबे असतील.

०११२१ खामगाव-पंढरपूर विशेष (४ सेवा) गाडी खामगाव येथून १४ व १७ जुलैला साडेअकराला सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीनला पंढरपूरला पोहोचेल. ०११२२ विशेष गाडी पंढरपूर येथून १५ व १८ जुलैला पाचला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री साडेसातला खामगावला पोहोचेल.

Ashadi ekadashi Special train to Pandharpur
Bhusawal-Pune Train : भुसावळ-पुणे-भुसावळ रेल्वेसाठी सकारात्मक : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com