Akshay Tritiya 2024: अक्षयतृतीयेनिमित्त कोट्यवधींची उलाढाल! नवीन वाहने खरेदी, गृहप्रवेश जोरात; सोने खरेदी, मात्र प्रमाण कमी

Jalgaon News : नागरिकांनी अक्षयतृतीयेच्या शुभेच्छा देण्यासाठी मोबाईलचा वापर केला. काहींनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या
gold shopping
gold shoppingesakal

जळगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर शुक्रवारी (ता. १०) बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल झाली. सोने खरेदीसह नवीन दुचाकी, चारचाकी वाहन, नवीन इलेक्ट्रानिक वस्तूंची खरेदी झाली. सुमारे सव्वाशेच्या वर नागरिकांनी नवीन घरात गृहप्रवेश केला. अनेकांनी नवीन व्यापार सुरू केले. नागरिकांनी अक्षयतृतीयेच्या शुभेच्छा देण्यासाठी मोबाईलचा वापर केला. काहींनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. (jalgaon Billions of turnover on Akshay Tritiya)

पारंपरिक पद्धतीने घागरपूजन

अक्षयतृतीया पितरांना भोजन देण्याचा (आगारी टाकणे) सण असतो. यादिवशी पितरांना पुरणाची पोळी, आमरस, पापड-कुरडई आदी पदार्थांचा नवैद्य दाखवून त्यांच्या नावाने आगारी टाकली, की पितरांचे आपल्या कुटुंबाला आशीर्वाद मिळतात, अशी परंपरा पूर्वीपासून आहे. यामुळे हिंदू घरात पितरांना वरील पदार्थांचा नवैद्य दाखविण्यात आला व पितरांच्या नावाने घागर भरण्यात आली.

चारशे दुचाकींची विक्री

अक्षयतृतीयेला सुमारे चारशे दुचाकींचे आरक्षण नागरिकांनी केले होते. शंभर चारचाकींचे आरक्षण झाले होते. नवीन वाहने घरी नेण्यात आली. यातून सुमारे पाच कोटींची उलाढाल झाल्याची माहिती आटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. इलेक्ट्रानिक वस्तूमध्ये पंखे, कुलर, एसी, मिक्सर, सोफासेट, आटाचक्की, मोबाईल आदी वस्तूंना मागणी होती. यातून सुमारे एक कोटींची उलाढाल झाल्याची इलेक्ट्रानिक वस्तू विकणाऱ्या दुकानदारांनी सांगितले.

सव्वाशे जणांचा नवीन घरात प्रवेश

आजचा मुहूर्त साधत सुमारे सव्वाशे नागरिकांनी नवीन घरात प्रवेश केला. नवीन घरांच्या किमती २० लाखांपासून ते ८० लाखांपर्यंत होत्या. अनेकांनी घरकर्ज घेतले आहे, तर काहींनी स्वत:जवळील पुंजी घर घेण्यासाठी लावली आहे. (Latest Marathi News)

gold shopping
Akshay Tritiya 2024 : सराफ बाजारात कोट्यवधींची उलाढाल; ऊन, पावसाचा खेळ तरी ग्राहकांमध्ये उत्साह

सोन्याला अधिक मागणी

सोन्याच्या बाजारपेठेत सोन्याला अधिक मागणी होती. सोन्याचा दर ‘जीएसटी’सह ७४ हजार ७४५ रुपये प्रतितोळा होता. चांदीचा दर ८७ हजार ३५ रुपये प्रतिकिलो होता. सोन्याच्या दरात शुक्रवारी दुपारी एक हजारांची वाढ, तर चांदीच्या दरात १५०० रुपयांची वाढ ग्राहकांना ऐनवेळी सोने, चांदी किती घ्यावी, असा प्रश्‍न निर्माण करणारी ठरली. यामुळे ठरविलेल्या वजनापेक्षा कमी वजनाचे दागिने खरेदी करण्यात आले. सुवर्ण बाजारातही कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.

आंबे, घागरींना मागणी

आंबे, घागरींना मोठी मागणी होती. ग्रामीण भागात अक्षयतृतीयेनिमित्त पत्यांचे डाव रंगले होते. सासूरवासीन महिला माहेरी आल्या होत्या. मैत्रीणींसोबत गप्पा गोष्टींसोबतच झाडाला झोका बांधून झोका घेण्याचा आनंद ‘आखाजी’ची गाणी गात घेताना दिसल्या

gold shopping
Akshay Tritiya 2024 : स्वप्नातील वाहनासाठी नाशिकरांनी साधला मुहूर्त; 20 ते 25 कोटींची उलाढाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com