
जळगाव : भाजपचे आणखी दोन नगरसेवक शिवसेनेत दाखल
जळगाव - महापालिकेत (Jalgav Municipal) सध्या नगरसेवकांचे (Corporator) कोलांटउड्या घेण्याचे सत्र सुरू आहे. शनिवारी (ता. १२) आणखी दोन भाजपच्या (BJP) नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश (Shivsena Entry) केला आहे. शुक्रवारी (ता. ११) भाजपच्या चार नगरसेवकांनी प्रवेश केला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे. भाजपच्या नगरसेविका उषाताई पाटील, नगरसेविका हसिनाबी शरीफ अशांनी आज शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.
भाजपतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांपैकी दहा जणांची पुन्हा घरवापसी झाली होती. त्यातील चार जणांनी शुक्रवारी पुन्हा कोलांटउडी घेत शिवसेनेत प्रवेश केला. हे वादळ शमत नाही तोच शनिवारी पुन्हा दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे आता शिवसेनेचे संख्याबळ ४२ झाले आहे.
हेही वाचा: 'हेमा मालिनीचे गाल सोडले...आता ओम पुरींचे गाल पकडले'- गुलाबराव पाटील
शुक्रवारी नगरसेवक प्रवीण कोल्हे, प्रिया जोहरे, मीना सपकाळे व मीनाक्षी पाटील तर आज नगरसेविका उषाताई पाटील, नगरसेविका हसिनाबी शरीफ यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. येथील अजिंठा रेस्ट हाऊसवर पालकमंत्री पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, सुनील महाजन, माजी महापौर ललित कोल्हे, माजी महापौर विष्णू भंगाळे, नितीन लढ्ढा आदी उपस्थित होते.
नागरी सुविधांवर भर
पालकमंत्री पाटील म्हणाले, की जळगाव शहर खड्डयात गेले आहे. आम्ही ६८ कोटींची रस्त्यांची कामे करणार आहे. भाजपची महापालिकेत सत्ता असताना शंभर कोटी आणून रस्ते चकाचक करू असे म्हणणाऱ्यांनी काहीच आणले नाही, अन् जळगावचे रस्ते खडड्यात गेले. रस्ते दुरुस्तीसाठी आम्हाला संख्या बळाची गरज आहे. गेल्या दोन वर्षात शहरातील रस्ते दयनीय झाले आहे. ते चांगले करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.
Web Title: Jalgaon Bjp Corporator Enter In Shivsena Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..