Taking the bodies of the accident victims from the airport to Bhusawal Warangaon in an ambulance.esakal
जळगाव
Nepal Bus Tragedy : हुंदके अन् मन हेलावणारा आक्रोश; वरणगाव, तळवेलला अश्रू अनावर
Bus Tragedy : प्रचंड अस्वस्थता, मृतदेहांची प्रतीक्षा. त्यामुळे होणारी तगमग. मधूनमधून येणारे हुंदके, अन् मृतदेह दाखल होताच मन हेलावणारा आक्रोश.
Nepal Bus Tragedy : प्रचंड अस्वस्थता, मृतदेहांची प्रतीक्षा. त्यामुळे होणारी तगमग. मधूनमधून येणारे हुंदके, अन् मृतदेह दाखल होताच मन हेलावणारा आक्रोश. नेपाळच्या भीषण दुर्घटनेतील मृतांचे नातलग, मित्रपरिवारच नव्हे; तर वरणगाव, तळवेल परिसरातील ग्रामस्थांची ही अवस्था. नेपाळमध्ये शुक्रवारी (ता. २३) बस नदीत कोसळून झालेल्या अपघातातील भाविकांचे मृतदेह शनिवारी (ता. २५) रात्री जळगावला पोहोचले. (bodies of devotees who fell into river in Nepal reached Jalgaon on Saturday )

