Local fishermen with a rescue team searching for a drowned youth in Tapi river.
Local fishermen with a rescue team searching for a drowned youth in Tapi river.esakal

Jalgaon: रायपूरजवळ आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह! तापी नदीत बचाव पथकाची 18 तास शोधमोहीम; हतनूरजवळील घटनेनंतर सावद्यात शोककळा

Jalgaon News : तब्बल अठरा तासानंतर त्याचा मृतदेह हाती लागला आहे. गुलाब सुरेश तायडे (वय २४, रा. सावदा) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे सावदा शहरात शोककळा पसरली आहे.
Published on

सावदा (ता. रावेर) : हतनूर येथे मित्रांसह फिरण्यासाठी गेलेला तरुण सोमवारी (ता. २०) सकाळी साडेदहाच्या सुमारास धरणापासून काही अंतरावर नदीपात्रात पडून बेपत्ता झाला होता. तेव्हापासून स्थानिक मच्छिमार व बचाव पथकाच्या मदतीने शोधमोहीम सुरू होती. अखेर तब्बल अठरा तासानंतर त्याचा मृतदेह हाती लागला आहे. गुलाब सुरेश तायडे (वय २४, रा. सावदा) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे सावदा शहरात शोककळा पसरली आहे. (Body of missing youth found near Raipur)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com