Computer Operator Sudhakar Koli
Computer Operator Sudhakar Koliesakal

Jalgaon Bribe News : ऑपरेटर लाचेच्या जाळ्यात; ग्रामसेवक पसार

Jalgaon : स्वावलंबन योजनेचा निधी मंजूर झाल्याने बक्षीस म्हणून एक लाख रुपये लाच ग्रामसेवकाने सांगितल्यानुसार घेताना चुंचाळे ग्रामपंचायतीचा संगणक ऑपरेटर सुधाकर धुडकू कोळी यास जळगाव एसीबीने अटक केली.
Published on

Jalgaon Bribe News : स्वावलंबन योजनेचा निधी मंजूर झाल्याने बक्षीस म्हणून एक लाख रुपये लाच ग्रामसेवकाने सांगितल्यानुसार घेताना चुंचाळे ग्रामपंचायतीचा संगणक ऑपरेटर सुधाकर धुडकू कोळी (वय ३५, चुंचाळे) यास जळगाव एसीबीने अटक केली. ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी (चुंचाळे) हा मात्र पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. हा सापळा शनिवारी (ता. १७) दुपारी एकच्या सुमारास यशस्वी करण्यात आला.

चुंचाळे येथील ४६ वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, चुंचाळे (ता. यावल) गावी त्यांच्या वडिलांच्या नावाची संस्था असून, त्यामध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीतून गावात शिलाई मशिन प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागातील महिला व युवतींना स्वावलंबी करण्याबाबत केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता.

मंजूर निधीतून तब्बल ५० टक्के बक्षीस म्हणून एक लाखाची लाच ग्रामसेवक हेमंत जोशी यांनी शुक्रवारी (ता. १६) मागितली होती. तक्रारदाराने याबाबत शुक्रवारी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली.

Computer Operator Sudhakar Koli
Jalgaon News : शिवजन्मोत्सव शांततेत साजरा करा : डीवायएसपी नंदवाळकर

...यांनी केली कारवाई

हा सापळा जळगाव पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, नाईक बाळू मराठे.

सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, नाईक सुनील वानखेडे, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने यशस्वी केला.

लाच स्वीकारताच झडप

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी सापळा रचल्यानंतर ग्रामसेवकाने लाचेची रक्कम ऑपरेटर यांच्याकडे देण्यास तक्रारदाराला सांगितल्यानंतर ऑपरेटर सुधाकर कोळी यांनी लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली, तर ग्रामसेवक हेमंत जोशी यांना सापळ्याबाबत कुणकूण लागताच ते पसार झाले. दोघांविरोधात यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

Computer Operator Sudhakar Koli
Jalgaon Polio Vaccination : जिल्ह्यात 3 मार्चपासून पल्स पोलिओ मोहीम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com