Jalgaon News | पुलाच्या कामाने अडविला महामार्ग; अरुंद रस्त्याने अपघात वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Bridge At work Advila Highway road Accident

जळगाव : पुलाच्या कामाने अडविला महामार्ग; अरुंद रस्त्याने अपघात वाढले

जळगाव : येथील तरसोद फाट्यावर व्हेईकल अंडरपास (व्हीपीयू)चे काम सुरू झाले आहे. मात्र पुलाच्या कामामुळे महामार्ग अडविला गेला आहे. यामुळे येथे सतत वाहतुकीची कोंडी होवून अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. कंत्राटदाराने पर्यायी रस्ता तयार केला मात्र तो केवळ बारा ते पंधरा फूट रुंदीचा आहे. यावरून मोठ्या वाहनांना कसरत करीत जावे लागते. त्या कसरतीतच वाहने एकमेकांना धडकून अपघात होत आहेत.

हेही वाचा: दहावी-बारावीसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र! एका वर्गात 25 विद्यार्थी

गेल्या आठ दिवसांपासून उड्डाण पुलाचे काम सुरू झाले आहे. कंत्राटदाराने उड्डाण पुलाचे काम सुरू करण्याअगोदर साईडचे रस्ते तयार करणे गरजेचे होते. तसे न करता लहानसा पर्यायी रस्ता केला. तोही अरुंद आहे. महामार्गावरून मोठी अवजड वाहने जातात. पर्यायी मार्गावर जाताना वाहतुकीत मोठी वाहन अडकतात. यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होते. पर्यायी मार्गावर मोठे स्पीडब्रेकरही विनाकारण करण्यात आले आहे. यामुळे वाहने एकमेकांवर आदळली जातात. दुसऱ्या बाजूच्या वळण रस्त्यावर खड्डे आहेत. शेजारी पुलाच्या बेसमेंटसाठी मोठा खड्डा तयार करण्यात आला आहे. वाहतुकींच्या कोंडीवेळी वाहने पुढे नेण्याच्या प्रयत्नात वाहने या खड्डयात पडण्याचा धोका आहे. वळण रस्त्यावर पथदर्शी फलक लावण्यात आला नसून रात्रीच्या वेळी पथदिवेही नाहीत. यामुळे रात्री वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. कंत्राटदाराने महामार्ग चौपदरीकरण करताना साईड रोड अगोदर तयार करायला हवा. नंतर मुख्य चौपदरी रस्ता तयार करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता अगोदर मुख्य चौपदरी रस्ता तयार करण्यात येत असल्याने महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा कायम आहे.

हेही वाचा: मोठी बातमी ! दहावी-बारावी परीक्षेला एका वर्गात 25 विद्यार्थी; परीक्षा केंद्रांमध्ये बदलाची शक्‍यता 

‘न्हाई’च्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

तरसोद ते फागणे महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना बायपासवर उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. याठिकाणी वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत कंत्राटदाराला सूचना देण्याचे काम ‘न्हाई’कडून झाले नाही. एव्हाना वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी पर्यायी चांगला मार्ग कंत्राटदाराने तयार केला नाही. वाहनधारकांच्या या समस्यांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप वाहनधारक करीत आहेत.

Web Title: Jalgaon Bridge At Work Advila Highway Road Accident

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top