जळगाव : आकाशवाणी, अजिंठा चौफुलीवर उड्डाणपूल तयार करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव : आकाशवाणी, अजिंठा चौफुलीवर उड्डाणपूल तयार करा

जळगाव : आकाशवाणी, अजिंठा चौफुलीवर उड्डाणपूल तयार करा

जळगाव ः शहरातील महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. आकाशवाणी चौकात रोटरी सर्कलमुळे वाहतुकीची कोंडीच मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने सुरू असलेले काम बंद पाडण्यात आला. यामुळे आता शहरातील कोणत्याच महामार्गावरील चौकात, वळण रस्त्यावर आता ‘सर्कल’ नकोच, महामार्गावरील आकाशवाणी चौक, अजिंठा चौफुलीवर आता उड्डाणपुलच तयार करावेत, अशी मागणी आता विविध क्षेत्रातून होत आहे.

"शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या पलीकडे चारपट वस्ती आहे. यामुळे तिकडून गावात येणाऱ्या वाहनांची संख्या दररोज हजारांच्या घरात आहे. महामार्गाचे चौपदीकरण होताना अजिंठा चौफुली, इच्छादेवी चौफुली, आकाशवाणी चौकात उड्डाण पुलांची गरज आहे. दिवसेंदिवस शहरातील वाहनांची संख्या वाढत आहे. भविष्य काळाचा विचार केल्यास वाहनांची संख्या अधिक असेल. त्याप्रमाणात रस्तेही असायला हवेत. यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरींकडे पाठपुरावा सुरू आहे."

- पुरुषोत्तम टावरी (वरिष्ठ उपाध्यक्ष, कॉन्फडरेशन ऑफ ॲाल इंडिया ट्रेडर्स)

"आकाशवाणी चौकात वाहतुकीची कोंडी नित्याचीच बाब आहे. कोंडीमुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अनेक वेळा अडकून पडावे लागते. येथे उड्डाणपुल झाल्यास वाहतुकीची कोंडी सुटेल. महामार्ग प्राधीकरणाने आगामी पन्नास वर्षात शहरात वाढणाऱ्या वाहतुकीचा विचार करू येथे उड्डाण पुलच तयार करावा."

- डॉ.राजेश पाटील (रोटरीचे माजी अध्यक्ष)

हेही वाचा: संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं

"महाबळ कॉलनीकडून जळगाव शहरात येण्यासाठी आकाशवाणी चौकात अनेक वेळा वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो. सकाळी व सायंकाळी अनेकवेळा तासनतास वाहतुकीची कोंडी होते. हे टाळण्यासाठी आकाशवाणी चौका उड्डाण पुलाचीच गरज आहे. भविष्यातील वाहतूक पाहता हेच योग्य आहे."

- इंजि. एच. एच. चव्हाण (मराठा सेवा संघ महानगराध्यक्ष)

"आकाशवाणी चौकात अगोदरच वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. महामार्गावरील वाहतूक येथे वाढली आहे. आता चौपदरीकरणात सर्कल मोठे तयार होते यामुळे वाहतुकीची कोंडी सुटण्याऐवजी कोंडीच अधिक होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून आकाशवाणी चौकातील तयार होणारे सर्कल रद्द करावे."

- अनिल अडकमोल (आरपीआय महानगराध्यक्ष)

loading image
go to top