Jalgaon News : धनादेश अनादरप्रकरणी वरणगावच्या इसमास 41 लाख अदा करण्याचे आदेश; बऱ्हाणपूर न्यायालयाचे आदेश

Jalgaon News : ४१ लाख रुपये याचिकाकर्त्याला अदा करण्यासह रक्कम अदा न केल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
court order
court orderesakal
Updated on

जळगाव : बऱ्हाणपूर येथील एका इसमाकडून ३० लाख रुपये घेऊन ते परत दिले नाही. त्यापोटी दिलेला धनादेश वटला नाही, म्हणून इसमाने संबंधिताविरुद्ध कलम १३८ अन्वये दाखल केलेल्या याचिकेत बऱ्हाणपूर न्यायालयाने वरणगावच्या इसमाला ४१ लाख रुपये याचिकाकर्त्याला अदा करण्यासह रक्कम अदा न केल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. (Burhanpur court order to pay 41 lakhs to youth of Varangaon in case of dishonor of order )

बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील गजानन जगन्नाथ महाजन (वय ५८) यांचे वरणगाव (ता. भुसावळ) येथील संजय नारायण देशमुख यांच्याशी मित्रत्वाचे संबंध आहेत. त्या संबंधातून संजय देशमुख याने महाजन यांच्याकडून ३० लाख रुपये हात उसनवारीने घेतले होते. ते वेळेत परत करेल, असे आश्‍वासनही त्याने दिले. रकमेच्या परतफेडीसाठी देशमुखने महाजन यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरी शाखेचा ३० लाखांचा धनादेश (क्रमांक ७६५०५१, ता. २४-२-२०२०) दिला.

court order
Jalgaon News : दहिगाव रस्त्याचे कॉंक्रिटीकरण; सामनेरसह लोकलखेडे, बोरनारच्या शेतकऱ्यांमधून समाधान

महाजन यांनी धनादेश वटविण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या बऱ्हाणपूर शाखेत जमा केला. मात्र, देशमुख यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने हा धनादेश वटला नाही. महाजन यांनी त्यानंतर रकमेसाठी देशमुखांकडे तगादा लावला. मात्र, रक्कम मिळाली नाही, म्हणून महाजन यांनी बऱ्हाणपूर न्यायालयात १३८ अन्वये चेक बाऊन्सची याचिका दाखल केली.

त्यात बऱ्हाणपूर न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायाधीश गुरुवेंद्र कुमार हुरवाडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यात देशमुख यांच्यावर दोष सिद्ध होऊन त्यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. या रकमेपोटी व त्यावरील व्याज, दंड व अन्य रक्कम, अशी एकूण ४१ लाख ७४ हजार ४६० रुपये महाजन यांना अदा करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. खालच्या न्यायालयाचा निर्णय कायम केला.

court order
Jalgaon News : जिल्ह्यात मेंढ्या येण्यास सुरुवात! पीक संस्थांशी करार; ठेलारी बांधवांचे वाडेही दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com