Jalgaon News : पत्रकारांच्या आंदोलनाला यश; बऱ्हाणपूर महामार्गाचे काम सुरू

Jalgaon : बऱ्हाणपूर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आधीच्या आंदोलनात आश्वासन मिळूनही याची पूर्तता न झाल्याने येथील पत्रकारांनी मंगळवारी (ता. ८) पुन्हा रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
 highway work start
highway work startsakal
Updated on

सावदा (ता. रावेर) : बऱ्हाणपूर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आधीच्या आंदोलनात आश्वासन मिळूनही याची पूर्तता न झाल्याने येथील पत्रकारांनी मंगळवारी (ता. ८) पुन्हा रास्ता रोको आंदोलन सुरू केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, अभियंता चंदन गायकवाड आणि ठेकेदार सुंदर कन्स्ट्रक्शन भांबरे यांनी आंदोलनस्थळी येऊन लेखी आश्वासन दिल्याने आणि त्याच क्षणाला काम सुरू केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. (Burhanpur highway work start with success of journalist agitation )

बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील फैजपूर ते चोरवड रस्त्याचे काम तत्काळ मार्गी लावावे, यासाठी येथील पत्रकार संघटना व विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, राजकीय प्रतिनिधींनी रस्ता तत्काळ दुरुस्ती करावी, यासाठी तब्बल सात तास रास्ता रोको आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार आंदोलनस्थळी भेट देऊन काम मार्गी लावणार नाही, तोपर्यंत आंदोलन मिटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने शिवाजी पवार व मक्तेदारांना आंदोलनस्थळी यावे लागले. (latest marathi news)

 highway work start
Jalgaon News : वाळूमाफियांच्या खड्ड्यामुळे गिरणा नदीत शेतकऱ्याचा मृत्यू! वाढलेल्या प्रवाहाने घेतला बळी

येथील तापी सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशन, पत्रकार संघटना व विविध पक्षांचे पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे आंदोलन पुकारले होते. सकाळी सातला आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आमदार शिरीष चौधरी, वंचित बहुजन पक्षाच्या जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील, धनंजय चौधरी, कोचूरचे शेतकरी संजय पाटील, सावद्याचे माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय महाजन, सय्यद अजगर, पंकज येवले, फिरोज खान पठाण, सुधाकर पाटील, राजेंद्र चौधरी, कुशल जावळे, सुनील नारखेडे, फैजपूरचे नगरसेवक कलीम मेंबर, भरत लीदुरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला, तर रोहिणी खडसे, श्रीराम पाटील, राजेश वानखेडे, अनिल चौधरी यांनी भ्रमणध्वनीवरून आंदोलकांशी चर्चा करून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

दरम्यान, जुलै ही कामाची अंतिम दिनांक असल्याने तिथपर्यंत काम करणे मक्तेदाराला बंधनकारक होते, तरीही मक्तेदाराने काम पूर्ण न केल्याने आंदोलन पुकारले होते. आता प्रशासनाने डिसेंबर नवीन डेडलाईन मक्तेदाराला दिली आहे.

 highway work start
Jalgaon News : राज्यातील महायुती सरकार दिवाळखोर : एकनाथ खडसे यांचा आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com