Jalgaon Accident : बसची बसला धडक; 55 प्रवासी जखमी, चाळीसगाव-कन्नड रस्त्यावरील बायपासजवळील घटना

Jalgaon Bus Accident : शहरातील कन्नड रस्त्यावरील बायपास पुलाखालून चाळीसगावकडे येणाऱ्या बसला पुलाच्या बाजूने भरधाव येणाऱ्या दुसऱ्या बसची जोरदार धडक बसली.
Bus damaged in collision on Kannada bypass road
Bus damaged in collision on Kannada bypass roadesakal
Updated on

चाळीसगाव : शहरातील कन्नड रस्त्यावरील बायपास पुलाखालून चाळीसगावकडे येणाऱ्या बसला पुलाच्या बाजूने भरधाव येणाऱ्या दुसऱ्या बसची जोरदार धडक बसली. या अपघातात दोन्ही बसमधील सुमारे ५५ प्रवासी जखमी झाले.

यात नऊ जण गंभीर जखमी असून, त्यातील तिघांना छत्रपती संभाजीनगर येथे, दोघांना धुळे, तर चौघांना शहरातील खासगी रुग्णलयात दाखल केले आहे. हा अपघात मंगळवारी (ता. ५) सकाळी नऊच्या सुमारास घडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com