.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
फैजपूर (ता. यावल) : तिड्या, मोहमांडली, अंधारमळी आदिवासी भागातील एसटी बससेवा खचलेल्या रस्त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून स्थगित करण्यात आली होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने या भागातील ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत होते. अखेर ग्रामस्थांनी ‘एनएसयूआय’चे प्रदेश सरचिटणीस, युवा नेते धनंजय चौधरी यांच्याकडे कैफियत मांडली.
अखेर धनंजय चौधरी यांनी स्वत: एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन थेट मोहमांडलीचा बस प्रवास केला व हा रस्ता बससेवेसाठी उपयुक्त असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे लवकरच या गावांमधून बस धावणार आहे. (Bus direct to Mohmandali for road condition check)