esakal | Jalgaon | बसचालकाला मारझोड पडली महागात
sakal

बोलून बातमी शोधा

बसचालकाला मारझोड पडली महागात

जळगाव : बसचालकाला मारझोड पडली महागात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पाचोरा-चाळीसगाव बस समोर सिनेस्टाईल स्कॉर्पिओ कार उभी करुन चालकाला बसखाली उतरवत मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. पाचेारा पोलिसांत दाखल या गुन्ह्यात सहा वर्षे न्यायालयीन लढ्या अंती बस चालक वाल्मीक सोमा जाधव यांना न्याय मिळाला असून मारहाण करणारा ललीत ऊर्फ छन्नू प्रकाश पाटील (रा. नेरी ता.पचोरा) याला तीनवर्षे सश्रम कारावास पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठेाठवण्यात आली आहे.

राज्यपरिवहन मंडळाच्या बसवरील चालक वाल्मीक सोमा जाधव त्याची ड्यूटी असलेल्या बस (एमएच.१४.बी.टी.४५४) याने प्रवासी घेऊन १३ डिसेंबर २०१५ ला पाचोरा येथून चाळीसगावला निघाले होते. आखातवाडे गावा जवळ सिल्व्हर रंगाच्या स्कॉर्पिओ धावत्याबस समोर आणून चालक वाल्मीक जाधव यांना ललीत ऊर्फ छन्नू प्रकाश पाटील (वय-४५) याने शिवीगाळ करून तू नेरीला चल, तुला दाखवतो, असे म्हणत धमकावले. बस नेरी गावाजवळ आली असता ललीत ऊर्फ छन्नु पाटील याने बस चालक वाल्मीक जाधव यांना चालक सिटवरुन खाली ओढत बेदम मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा: यंदा कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा होणार

बसवरील वाहक तुषार साखरे व प्रवाश्यांनी संशयीताच्या तावडीतून सोडवले. घडला प्रकार डेपो मॅनेजर चक्रधर पाटील यांना कळवल्यावर त्यांनी तत्काळ पर्यायी चालकाची व्यवस्था करत प्रवाश्यांना नियोजीत ठिकाणी आणले. जखमी बस चालक वाल्मीक जाधव यांच्यावर नगरदेवळा ग्रामणी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांच्या जबाबावरुन पोचारा पोलिसांत ललीत ऊर्फ छन्नु प्रकाश पाटील याच्या विरुद्ध शासकिय कर्मचार्याला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाधीकारी प्रकाश पाटिल यांनी गुन्ह्याचा वेळेत तपास पुर्ण करुन खटला जिल्हा न्यायालयात दाखल केला. न्या. एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरु होते.

नऊ साक्षीदारांच्या साक्षी सरकारी अभियोक्ता ॲड. सुरेंद्र काबरा यांच्यावतीने फिर्यादी वाल्मीक जाधव,प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्याबस वरील वाहक तुषार साखरे, उपचार करणारे डॉ.अतुल महाजन, डेपेा मॅनेजर चक्रधर पाटील, बबलू पाटील यांच्यासह गुन्ह्याचे तपासाधिकारी प्रकाश पाटिल अशा नऊ महत्वपुर्ण साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आल्या. बचावपक्षातर्फे मांडण्यात आलेले मुद्दे ॲड. काबरा यांनी आपल्या युक्तीवादात खोडून काढत प्राप्त पुराव्यांच्या आधारे जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली.

loading image
go to top