Jalgaon: बसस्‍थानकाच्‍या फलाटावर खासगी ट्रॅव्‍हल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बसस्‍थानकाच्‍या फलाटावर खासगी ट्रॅव्‍हल!
बसस्‍थानकाच्‍या फलाटावर खासगी ट्रॅव्‍हल!

जळगाव : बसस्‍थानकाच्‍या फलाटावर खासगी ट्रॅव्‍हल!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या आवारात खासगी वाहनांना प्रवेश बंदी असते. अर्थात लालपरीला फायदा व्‍हावा; या दृष्‍टीने हा नियम लागू केला आहे. मात्र आता चक्‍क पोलिस बंदोबस्‍तात बसस्‍थानकातील फलाटावरील लालपरीची जागा खासगी ट्रॅव्‍हल्‍सने घेतल्याचे चित्र बुधवारी (ता. १०) बघायला मिळाले. यामुळे प्रवाशांची सोय होऊ लागली आहे.

एसटीचे महाराष्‍ट्र शासनात विलीनीकरण करावे; या प्रमुख मागणीसह अन्‍य मागण्यांसाठी राज्यात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे एसटीचे चाके थांबली आहेत. जळगाव जिल्ह्यात पाच हजार दैनंदिन फेऱ्या रद्द होत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात गावाकडे परतणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. दरम्यान, गृह विभाग (परिवहन) यांनी अधिसूचना काढून मोटार वाहन अधिनियमातील कलमानुसार खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या बसेस आदी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली आहे. या आदेशानुसार बुधवारी जळगावच्‍या मध्यवर्ती बसस्थानकाच्या फलाटावरून खासगी ट्रॅव्‍हल्‍स सोडल्‍या जात आहेत. पोलिस बंदोबस्तात ही प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा: T20 WC ENG vs NZ : इंग्लंडच्या पदरी झिरो; न्यूझीलंड ठरला हिरो

दूरवरच्या प्रवासासाठी बसेसही दाखल झाल्या आहेत. १४–१ प्रमुख मार्गावर सोडणार ट्रॅव्‍हल्‍स आजपासून बसस्‍थानकातून खासगी गाड्यांमधून प्रवासी वाहतूक केली जात आहे. यानुसार जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. प्रमुख मार्गावर या गाड्या उपलब्ध होतील, त्याप्रमाणे सुरू केल्या जातील. एसटीच्या तिकिटाप्रमाणे यांना दर आकारण्याबाबत सूचना दिल्या आहेत. शिवाय खासगी गाड्या अडवल्या जाऊ नयेत म्हणून पोलिस बंदोबस्तात या गाड्या रवाना केल्या जात आहेत.

१४–१ प्रवेशद्वाराजवळ रिक्षा, कालिपीली महामंडळातील कर्मचारी संपावर असल्‍याने प्रवासी वाहतूक बंदच आहे. तरीदेखील अनेक प्रवासी बसस्‍थानक आवाराजवळ येत असतात. अशा प्रवाशांना नेण्यासाठी स्‍थानकाच्‍या प्रवेशद्वाराजवळ रिक्षा व कालिपीली लावल्‍या जात आहेत. इन्‍फो तिसरा दिवसही बंद राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या कर्मचाऱ्यांचा संप कायम असून जळगाव विभागात पूर्णपणे बंद आहे. सलग तिसरा दिवस ही बससेवा बंदचा राहिली असून, तीन दिवसात सव्‍वाचार कोटी रूपयांचे नुकसान जळगाव विभागाला झाल्‍याचा अंदाज वर्तविला आहे.

loading image
go to top