Jalgaon bypass one way traffic
esakal
जळगाव : गेल्या महिन्यात ३१ जुलैला झालेल्या अतिवृष्टीने महामार्गावरील पाळधी-तरसोद वळण (बायपास) रस्त्यावरील पुलाचा भराव खचला होता. त्यानंतर वळण रस्ता वाहतुकीसाठी बंद केला (Jalgaon Highway 53 road repair) होता. तब्बल महिनाभरानंतर ‘बायपास’वरून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, रस्ता पूर्णपणे दोन्ही बाजूंनी सुरू होण्यासाठी दोन महिने प्रतीक्षा करावी लागेल. यामुळे जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतुकीचा ताण व होणारी वाहतूक कोंडी कायम राहणार आहे.