
Jalgaon Municipality Worker Protest : येथील नगरपालिकेतील संवर्ग कर्मचारी यांनी गेल्या २९ ऑगगस्टपासून संप पुकारला आहे. महाराष्ट्र राज्य नगरपालिका संवर्ग अधिकारी यांना पाठिंबा जाहीर करीत या संपात नगरपालिका कर्मचारी यांनी सहभाग घेतला. त्यामुळे नगरपालिकेतील कामकाजावर त्याचा विपरित परिणाम झाल्याने कामकाज ठप्प झाले. नगरपालिकेतील संवर्ग कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक किशोर चव्हाण यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देत पालिका कार्यालयाबाहेर निदर्शन केली. (cadre employees of municipality have called strike since last August 29 )